महाराष्ट्र वेदभुमी

पत्रकार सत्यप्रसाद आडाव यांना मातृशोक

 

 रोहा तालुक्यातील न्हावे येथील रहिवासी पत्रकार सत्यप्रसाद आडाव यांच्या मातोश्री सुलोचना आडाव यांचे मंगळवार दि.१२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ :२५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले...त्या समयी त्या ८८ वर्षाच्या होत्या मागील महिनाभरापासून त्या आजारी होत्या...

             कै. सुलोचना आडाव यांचा स्वभाव  दयाळू , परोपकारी व मनमिळाऊ होता....त्यांने लहानपणापासून खुप कष्ट व मेहनत केली . कै. सुलोचना आडाव यांच्या पश्चात तीन मुली , एक मुलगा , सून ,नातवंड , पतवंड , जावई असा मोठा परिवार आहे... त्यांच्या निधनाची बातमी समजताच न्हावे गावचे आजी , माजी सरपंच , उपसरपंच , पत्रकार बांधव , समाज बांधव , ग्रामस्थ , राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते...

 यावेळी उपस्थितींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली कै. सुलोचना आडाव यांचे दशक्रिया विधी गुरुवार दि. २१ नोव्हेंबर रोजी सोमनाथ मंदिर सारसोली येथे तर उत्तरकार्य रविवार दि. २४ नोव्हेंबर रोजी राहत्या घरी न्हावे येथे होणार आहे...

Post a Comment

Previous Post Next Post