शहानवाज मुकादम/रोहा
मुरुड: पोलीस ठाण्या च्या हद्दीत विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कोणताही आनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठीच मुरुड पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक श्री नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनात केंद्रीय रिझर्व फोर्स चे 40 जवान, दंगा काबु पथक, वडखल चे 30 पोलीस जवान तसेच मुरुड पोलीस ठाण्याचे 20 पोलीस कर्मचारी यांनी मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजपुरी कोळीवाडा, राजपुरी मोहल्ला व बाजार पेठ, एकदरा, मारूती नाका,आझाद चौक, डोंगरी, चिखल पाखडी नाका, नांदगाव अदि भागात पोलीसांकडून संचलन करण्यात आले...