सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- माजी आमदार रामटेक मा. मल्लिकाअर्जुन रेड्डी यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांच्या जनसंपर्क कार्यालयात दि. (11) ला सदिच्छा भेट दिली. त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. रामटेक विधानसभा निवडणूक 2024 संदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले, खुशालजी तांबडे, तालुकाप्रमुख हरिभाऊ लोहबरे माजी नगरसेवक शिवराज माथुरकर, शहरप्रमुख जितु साठवणे, सरपंच अक्षय पंचबुधे, माजी शहरप्रमुख राजूजी बारई, बाजार सामिती संचालक दिगंबर बंगाळकर,अनिकेत झोड, स्वप्नील मानकर, हरिभाऊ मारबाते, संजय ढोबळे,प्रकाश कावळे, बंटी हटवार, शुभम बावनगडे, रामभाऊ उके व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते..
