मयूर पालवणकर (मुरुड): बीड विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड घडली आहे. आठवड्याभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झालेल्या ज्योती मेटे यांनी आज बंडखोरी करत शिवसंग्राम पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून संदीप क्षीरसागर यांना तिकीट देण्यात आले, त्यानंतर मेटे यांनी शिवसंग्रामच्या तिकिटावर निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे बीड मतदारसंघात राजकीय वातावरण अधिक तापले आहे...