महाराष्ट्र वेदभुमी

मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यासमवेत युट्युबरने साजरा केला वाढदिवस

मतिमंद विद्यार्थ्यांना शिक्षणापयोगी वस्तू भेट

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:- एकीकडे आपण बघतो की, व्यक्ती श्रीमंत असो वा गरीब स्वतःचा वाढदिवस आला की अतोनाथ पैशाची उधळपट्टी करीत मित्रांना पार्टी देऊन वाढदिवस साजरा करतांना बरेचजण दिसत असतात...मात्र आपला वाढदिवस आल्यावर मित्रांना पार्टी देऊन पैसे खर्च करण्यापेक्षा त्याच पैशात मतिमंद मुला-मुलींना शिक्षणात उपयोगी येणारे साहित्य भेट देऊन वाढदिवस साजरा करणारे व्यक्ती बोटावर मोजण्याइतके दिसतात. असाच एक जिवंत उदाहरण रामटेक तालुक्यातील एका युट्युबरने दिला आहे...त्याने मित्रांना पार्टी न देता स्वतःचा वाढदिवस शितलवाडी येथील स्नेह-सदन मतिमंद मुलांच्या शाळेत जाऊन वाढदिवस साजरा करून एक आदर्श भारताचा नागरिक म्हणून ओळख प्राप्त केली आहे...

रामटेक तालुक्यातील मनसर येथील गरीब कुटुंबातील रहिवासी विक्की गजानन सोनवाने याचा युट्युब वर 'फिक्स एक्सप्लेनर' नावाचे युट्युब चॅनेल असून ४ लाख पेक्षा जास्त सबस्क्राईबरस

 असून त्यांना सिल्वर बटन देखील प्राप्त झाले आहे... अत्यंत गरीब कुटुंबातील विक्कीने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी मित्रांना पार्टी देऊन पैसे खर्च करण्यापेक्षा शितलवाडी येथील स्नेह-सदन मतिमंद मुलांच्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षणात उपयोगी पडणारे साहित्य व फळ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला... यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद बघावयास मिळाला. यावेळी विक्की सोनवाने, रिषल घोडमारे, इशिका नेवारे, प्राची गजबे, रानु डडमल, रुचिका घोडमारे, शाळेचे मुख्याध्यापक पंकज पांडे, शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post