सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- समर्थ शिक्षण मंडळ,रामटेक व्दारा संचालित समर्थ प्राथमिक शाळा, रामटेक येथे शनिवार दि.(५) ला पालक सभा व प्रथम घटक चाचणी (युनीट टेस्ट ) प्राविण्यप्राप्त विद्यार्थांचा बक्षिस वितरण समारंभाचे आयाेजन शाळेतिल सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले होते...
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेस माल्यार्पण व दिप्रज्वलन करुन करण्यात आली... यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका साै.कविता जाैजाळ मँडम, पालक समिती सदस्य श्री.शंकरजी बलगेवार, साै.रेणुका वासनिक हे तर प्रमुख पाहुणे म्हणुन श्री.पंकज बावनकर उपस्थित हाेते...या पालक सभेत पालकांची उपस्थिती व सहकार्य अभुतपुर्व हाेते...प्रास्ताविक भाषणात मुख्याध्यापिका जौंजाळ मँडम यांनी ए.आय. बेस अभ्यासक्रमाच्या माध्यमातुन पालकांना मुले शैक्षणिक कौशल्य कशाप्रकारे अवगत करतील या शैक्षणीक प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले तसेच या तंत्रद्यानाचा वापर शाळेत कशाप्रकारे करण्यात येणार आहे याची माहिती पालकांना त्यांनी दिली...मुलांच्या या शाळेतील शिक्षण प्रक्रिया व होणा-या विकासाबद्दल पालक समाधानी आहेत काय? या विषयी माहिती त्यांनी घेतली...
त्याचबराेबर पालकांनी सुध्दा आपल्या पाल्याचा शैक्षणिक प्रक्रियेबद्दल जागृक राहण्याचे आवाहन त्यांनी केले... शाळेत सुरु असलेल्या सर्व विद्यार्थीकेंद्रित उपक्रमाची माहिती व यापुढे सुरु हाेणार असणाऱ्या सर्व उपक्रमांची माहिती सभेत देण्यात आली... त्यानंतर प्रथम घटक चाचणी मध्ये प्राविण्या प्राप्त अनुक्रमे पहिला , दुसरा , तिसरा व चौथा क्रमांक प्राप्त विद्यार्थांना नाेटबुक सेट पारिताेषिक देऊन गाैरविण्यात आले... कार्यक्रमाच्या शेवटी पालकवर्गांच्या चेहर्यावरील समाधान व आनंद पाहुन शिक्षक शाळेत विद्यार्थांप्रती घेत असलेली मेहनत व सर्व शिक्षकांची आपल्या कर्तव्याप्रती असलेली प्रामाणिकता झळकून आली... कार्यक्रमाचा यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी माेलाचे सहकार्य केले...
