सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक: कविकुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (किट्स) रामटेक आर्किटेक्चर विभागाच्या १९९४ ते २००० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे २४ ऑक्टोबर २०२४ ला कालिदास सेमिनार सभागृह येथे सम्मेलन आयोजित करण्यात आले होते... सम्मेलना मधे भारतासह विविध देशांतील विद्यार्थी सहभागी झाले होते... कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.अविनाश श्रीखंडे यांच्या हस्ते करण्यात आले...
यावेळी आर्किटेक्टर विभाग प्रमुख प्रा.कल्पना ठाकरे, किट्सच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. मंगेश जयस्वाल, माजी विद्यार्थी प्रतिनिधी मेखला नायडू, आलोक लुनिया, विभागप्रमुख, डीन, माजी व वर्तमान विद्यार्थी उपस्थित होते... प्राचार्य डॉ.अविनाश श्रीखंडे म्हणाले की, माजी विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याने भारतासह जगात किट्सचा गौरव केला आहे... माजी विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाची माहिती व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यावे...
किट्स महाविद्यालयातील उत्कृष्ट शिक्षण व शिस्तीमुळे चांगल्या संस्थांमध्ये कार्यरत असल्याचे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतात सांगितले... किट्सबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले की ३० वर्षे जुन्या आठवणी ताज्या झाल्या असून, जुन्या मित्रांना भेटून खूप आनंद झाला... माजी विद्यार्थ्यांनी किट्स कॅम्पसला भेट देऊन समाधान व्यक्त केले... यासोबतच त्यांनी विद्यार्थी, विभागप्रमुख आणि प्राध्यापकांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.अभिलाषा डोंगरे, प्रा. भावना राऊत यांच्यासह इतरांनी प्रयत्न केले, प्रास्ताविक प्रा. मंगेश जैस्वाल यांनी केले... संचालन प्रा. अंजली नरड तर आभार प्रा. शीतल काठीकर यांनी केले...