महाराष्ट्र वेदभुमी

अनियमित पिण्याचा पाणी पुरवठा; नागरीक त्रस्त...


माणगाव :- (नरेश पाटील) गेली अनेक दिवस पिण्याच्या पाणी पुरवठयाची वेळ कोलमडल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत.. यात गृहिणी महीला विशेषतः त्रस्त आहेत... नगर पंचायत मार्फत  पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.. पाणी पुरवठ्याची प्रत्येक वॉर्डमध्ये एक निश्चित वेळ ठरल्याने सर्व व्यवस्थित आणि सुरळीतन असतानाच गेली अनेक दिवसांपासून अनियमित पाणी पुरवठ्याचा प्रकार सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ उडत आहे...

  पाणी पुरवठ्याची वेळ निश्चित कळत नसल्याने अनेक गृहिणी महीलामध्ये याबाबत एकमेकाकडे विचारपुस तसेच चर्चा होत असल्याचे ऐकायला मिळत आहे.... फोन करून किंवा मेसेज सोसियल मीडिया प्लॅटफॉर्म वरून पाणी पुरवठा होणार असल्याची अपडेट करण्यात येत असल्याने कामावर गेलेल्या लोक (महीला)कामे टाकून पाणी भरण्यासाठी कामावरून त्वरित निघून येत आहे.. मात्र असे किती दिवस ही अनियमीत वेळ राहणार ? असा प्रश्न प्रत्येक महिलांच्या मनात निर्माण झाल्याने गृहिणी महिलांना तर ही मोठी डोके दुःखी बनली असून याबाबत मोठा रोष वाढलाय..  याबाबत विचार विनिमय करण्यासाठी आज सोमवार दि. २१ ऑक्टोबर रोजी एक बैठक एका वॉर्डमध्ये नगर पंचायतीनी नियमित पाणीपुरवठा करण्याकरिता तात्काळ बोलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे... तसेच काही दिवसा पूर्वी वॉर्ड क्र. दोनमध्ये आमचे प्रतिनिधि काही कामकाजासाठी तिथे गेले असता एका महिलेने ही समस्या त्याठिकाणी मांडली आहे... त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा वेळेचे तिन तेरा वाजले असल्याचे या महिलेने मांडलेल्या समस्येवरून दिसून आले.. त्यामुळे  नगरपंचायतने याबाबत नोंद घेवून पूर्वी सारखेच नियमित वेळेत पाणी पुरवठा करण्याची मागणी जनतेतून होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post