महाराष्ट्र वेदभुमी

रायगडात कुणबी समाज एकटवला;जरांगेच्या सगेसोयरे सरसकट मराठा कुणबी दाखल्याला विरोध

तहसील दारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.

श्याम लोखंडे रोहा रायगड

राज्यात मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाच्या दबावतंत्राला बळी पडून मराठा समाजाच्या ओबीसीकरणासाठी मराठा समाजाच्या सगेसोयऱ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना अंतिम करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात ओबीसी समाज पुन्हा एकटवला असून जरांगे पाटील यांच्या तसेच सरकार त्यांना देत आसलेल्या आश्वासनाला निवेदनातून थेट रायगड रोहा तालुक्यातील कुणबी समाज्याच्या वतीने इशारा पत्र देण्यात आले आहे तसेच कुणबी समाजाच्या सामजिक,शैक्षणिक,आणि आर्थिक,अशा विविध मागण्यांचे दोन निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांना सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी देण्यात आले आहे.


यावेळी कुणबी समाज नेते शंकर म्हसकर,सुरेश मगर,रोहा तालुका अध्यक्ष रामचंद्र सकपाळ,मारुती खांडेकर, शंकरराव भगत, मारूती मालुसरे, गोपीनाथ गंभे,खेळु ढमाळ,संतोष खेरटकर,सुहास खरिवळे,निवास खारिवले,महेश ठाकूर,सतीश भगत,दिनेश रटाटे अनंत थिटे,संदेश लोखंडे, यशवंत हलदे,गुणाजी पोटफोडे,महेश तुपकर,दगडु बामुगडे,अरविंद मगर, ज्ञानेश्वर दळवी, दत्ताराम झोळगे, शिवाजी मुटके, वसंत मरवडे, नरेंद्र सकपाळ,मोरेश्वर खारिवले,गोविंद कचरे, मुरलीधर ठमके, शशिकांत कडू,सह तालुका तसेच विभागातील कुणबी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते...

तर यावेळी रोहा तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार थोरे यांनी निवेदन स्वीकारत पुढे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले...

Post a Comment

Previous Post Next Post