मयूर पालवणकर (मुरुड) : गडचिरोलीच्या अहेरी मतदारसंघात आ धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम शरद पवार गटात लढण्यासाठी सज्ज झाली आहे, त्यामुळे बाप-लेकीची लढाई अपेक्षित आहे... दुसरीकडे, बुलढाण्यातील सिंदखेडराजा मतदारसंघात माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवारांच्या गटाचा त्याग करून शरद पवारांच्या गटात प्रवेश केला आहे... यामुळे त्यांची पुतणी गायत्री शिंगणे नाराज असून, ती अजित पवार गटातून निवडणूक लढण्याची तयारी करत आहे... काका-पुतणी यांच्यातील हा संघर्ष चर्चेचा विषय ठरणार आहे...