महाराष्ट्र वेदभुमी

ऋणानुबंध - पालक व पाल्या मधील सुमधुर नात्याचे.

नवीमुंबई नेरुळ प्रतिनिधी : दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ रोज़ी दुपारी २ ते ४.३० हया वेळेत हिंदूहृदयसम्राट स्व.श्री. बाळासाहेब ठाकरे सभागृह सेक्टर १८ नेरुळ येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर, बाल संस्कार, गर्भसंस्कार, शिशुसंस्कार, व युवा प्रबोधन विभाग अंतर्गत ऋणानुबंध - पालक व पाल्या मधील सुमधुर नात्याचे...हया विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते...

सध्याच्या काळातील पालक व पाल्यांमधील बदलत चाललेल्या नातेसंबंधांमधील आवाहनांना यशस्वीरित्या सामोरे जाण्यासाठी मुख्यतः या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते...

या कार्यक्रमात मार्गदर्शन करत असताना श्रीगुरुपीठ प्रतिनिधि , वक्त्या सौ. प्रतीक्षाताई येवले व सहकारी सौ. कविताताई. चोर्डेकर, यांनी पाल्य आणि पालक यांच्या जीवनातील ऋणानुबंध पुन्हा जागृत करण्याचं काम केलं... या धावत्या युगात आपण आपल्या पाल्याकडे कसे दुर्लक्ष करत असतो आणि त्यांच्याकडून कशा पद्धतीने अपेक्षा ठेवत असतो हे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून सर्व पालकांना दाखवून दिले तसेच पाल्यानीसुद्धा आपले ध्येय निश्चित करून ते साध्य कसे करावे आणि पालकासोबत कसे वागले पाहिजे, आई वड़िलाचा आदरतिथ्य कसा ठेवला पाहिजे, आपण आपली नाती कशी जपली पाहिजे यावर सुंदर असे मार्गदर्शन करून विविध कृती मधून ते पटवून दिले...


आलेले सर्व पाल्य आणि पालक हयानी मार्गदर्शन चालू असताना एकमेकांना मिठी मारून आपल्या भावना व्यक्त केल्या... 

शेवटी पालकांनी अभिप्रायातून प्रचंड अशी ऊर्जा या कार्यक्रमातून मिळाली आणि जिव्हाळ्याची नाती जपण्याची जबाबदारी आम्ही आत्मीयतेने पार पाडु असे सांगीतले...

या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी श्री. स्वप्नील पंढरीनाथ घोलप समाजसेवक,  हे उपस्थितीत होते...

या सर्व कार्यक्रमाचे नियोजन श्री स्वामी समर्थ सेवा नेरुळ केंद्र ( दिंडोरी प्रणित) प्रतिनिधी व सर्व युवा प्रतिनिधी यांनी केले होते.

Post a Comment

Previous Post Next Post