महाराष्ट्र वेदभुमी

दक्ष पाटिलने रोवला मानाचा तुरा, ठरला दोन सुवर्ण पदकांचा मानकरी


अलिबाग  वार्ताहर: इंटरनॅशनल कराटे चॅम्पिनशिप २०२४ मध्ये रेवदंड्यातील दक्ष दिपेश पाटील यांनी मिळवले दोन सुवर्ण पदके. वाडो रयू कराटे डू वर्ल्ड स्पोर्ट्स युथ असोसिएशन इंडिया आणि कॉम्बॅट मार्शल आर्ट्स असोसिएशन इंडिया यांच्या संयुक्त वद्यमाने मुंबई अंधेरी येथे दि.२९ रोजी भरवण्यात आलेल्या कराटे स्पर्धेत दक्ष दिपेश पाटील यांनी फाईट आणि कट्टा मध्ये दोन सुवर्ण पदके मिळावी आहेत...

           राहुल तावडे यांचे शितोरियू कराटे एसोसिएशन क्लास अलीबाग येथे प्रशिक्षण घेत असलेल्या दक्ष दिपेश पाटील यांचे सर्वच स्थरावरून कौतुक करण्यात येत आहे, प्रशिक्षक राहुल तावडे यांनी योग्य मार्गदर्शन केल्याबदल त्यांचे सुद्धा विशेष अभिनंदन करण्यात आले व दक्ष पाटील यांस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या...

Post a Comment

Previous Post Next Post