महाराष्ट्र वेदभुमी

मुंबई गोवा हायवेवरील वाहतूक कोंडी,कोलाड ते माणगाव दरम्यान लांबच लांब रांगा


कोलाड (श्याम लोखंडे ): मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड ते माणगाव दरम्यान  इंदापूर २३ किलोमीटरच्या अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असुन वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे यामुळे प्रवाशी वर्गाचा खोलंबा निर्माण झाला असल्याने एकच संताप व्यक्त केला जात आहे...

गणेश उत्सवासाठी लाखो चाकरमानी आपल्या गावाला येत असतात...यावर्षी ही सकाळ पासून मुंबई गोवा महामार्गावरुन टुव्हीलर, रिक्षा, फोरव्हीलर, एसटी बस, खाजगी बस, मालवाहू ट्रक, प्रचंड मोठया प्रमाणात वाहतूक सुरु झाली झाल्यामुळे  कोलाड इंदापूर ते  माणगाव या २३ किलोमीटरच्या अंतरावर लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे... यामध्ये कोलाड इंदापूर, माणगाव बाजारपेठेतील रस्ता एकेरी असल्यामुळे येथे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असुन यामुळे प्रवाशी वर्गाचा खोलंबा झाला असुन गावाला जाण्यासाठी विलंब होत आहे... या वाहतूक कोंडीमुळे चार ते पाच तासाच्या प्रवासाला १२ ते १५ तास लागत आहे...                            मुंबई गोवा हायवे वरील प्रवास सुखकर व्हावा यासाठी रायगड पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असुन जागजागी ठेवण्यात आलेल्या पोलिस बंदोबस्तामुळे वाहतूक कोंडी सुरळीत होण्यासाठी शर्थिचे प्रयत्न करीत आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post