अडीच महिने होऊन प्रवेश मिळाला नाही
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक : शिक्षण विभागाकडुन विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी वाढीव जागा अद्याप निश्चित झाल्या नसल्याने रामटेक क्षेत्रातील ११वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्थाची प्रवेशप्रक्रीया गेल्या अडीच महिन्यापासुन रखडली आहे...या ढिसाळ धोरणामुळे शेकडो विद्यार्थ्यांच्या भविष्यला ग्रहण लागले आहे...
यावर्षी वर्ग ११ वी विज्ञान करिता प्रवेश फेरी १ जुलाई २०२४ पासुन सुरुवात झाली आहे...निकाल चांगला जास्त लागल्याने नामाकिंत शाळेच्या निर्धारित अनुदानीत कोटा लवकरच पूर्ण झाला... अतिरिक्त शेकडो विद्यार्थ्यानी प्रवेश प्रक्रियेचा फाँर्म रामटेक तालुक्यातील विज्ञान विभागाच्या १२ जूनियर विद्यालयात भरला असुन परंतु अजुन पर्यन्त अडीच महीने लोटून सुद्धा शिक्षणाधिकारी नागपुर, उप संचालक नागपुर, शिक्षण संचालक, पुणे या शिक्षण विभागाची लापरवाहीमुळे परमिशन मिळाली नाही... व उत्तरही मिळाले नसुन त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगनिला लागले आहे... यामुळे विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये भारी आक्रोश आहे... यांचा त्रास शाळेच्या व्यवस्थापनाला होत आहे... विद्यार्थी व पालक वारंवार शाळेच्या व्यवस्थापनाला एडमिशन करिता विचारत आहेत...
दोन वर्षापूर्वी गंभीर......
मागील दोन वर्षापासून एक गंभीर समस्या शिक्षण विभागाने निर्माण केली आहे...विज्ञान विभागाच्या क्षमतेनुसार प्रवेश प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर बरेचसे विद्यार्थी प्रवेशा पासून वंचित राहतात... कोणिही विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या विषयापासून वंचित राहू नये म्हणून सर्व शिक्षण संस्था अतिरिक्त जागेची परवानगीसाठी शिक्षणाधिकारी, माध्यमिक जिल्हा परिषद, नागपूर यांचेकडे अर्ज करायचे... शिक्षणाधिकारी रामटेक तालुक्यातील सर्व शाळेच्या विज्ञान शाखेच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याची खातरजमा केल्यानंतर वाढीव जागा विद्यार्थ्याचे व पालकाचे हित लक्षात घेता यथाशिघ्र मंजूर करायचे...
दोन वर्षापासुन प्रवेश प्रक्रिया किचकट
परंतू मागील दोन वर्षापासून ही प्रक्रिया प्रशासनाने जास्त किचकट केली आहे... आता मागील दोन वर्ष्या पासुन प्रथम शिक्षणाधिकारी नागपुर याना शिक्षण संस्थानी वाढीव जागेकरीता अर्ज करवा लागतो... शिक्षणाधिकारी नागपुर हे डेप्युटी डायरेक्टर नागपुर याना पाठवतात... उप संचालक हे शिक्षण उपसंचालक, पुणे यांना पाठवीतो... परत असाच प्रवास सुरु होतो. या वर्षी निषकाळजीपणा आणि दिरंगाईची हद्द झाली... अडीच महिने लोटून अजुन परवानगी आली नाही.. जो पर्यन्त परवानगी येत नाही तो पर्यन्त विद्यार्थ्याना प्रवेश द्यायचा नाही असा शिक्षण विभागाचा नियम आहे... जर चुकुन विद्यार्थ्याना प्रवेश दिला तर शाळावर दंडात्मक कार्रवाईचा आणि विद्यार्थी प्रवेश पत्र नाकारण्यात येईल असा शिक्षण विभागाचा आदेश आहे...
