महाराष्ट्र वेदभुमी

गणेश भक्तांचे आकर्षण ग्रामस्थ उत्कर्ष मंडळाचा नवीन शेव्याचा राजा

नवीन शेवा उरण २१ सप्टेंबर (अजय शिवकर) : महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव , मोठ्या हर्षोत्सवाने सर्वत्र साजरा केला जातो , भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला काही घरात तर काही ठिकाणी सार्वजनिक उत्सव साजरा केला जातो... दीड दिवसापासून ५/१० व २१ दिवसापर्यंत गणपती मांडले जातात... भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला सुद्धा खूप ठिकाणी गणपतीचे आगमन होते त्या गणपतींना विघ्नहर्ता  संकष्टी चतुर्थीचे गणपती म्हणजेच साखर चौथीचे गणपती असे म्हणतात... हे बहुदा अडीच दिवसाचे असतात...गेल्या १३ वर्षापासून ग्रामस्थ उत्कर्ष मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा नवीन शेव्याचा राजा हा उरण मधील गणेश भक्तांसाठी विशेष आकर्षण म्हणून ओळखला जातोय...सामाजिक एकी आणि शांततेसाठी नवीन शेवा गावात ग्रामस्थ उत्कर्ष मंडळाने  २०१२  पासून या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली...

मंडळ या गणेशोत्सव सोहळ्यात  महिलांचे सन्मानात्मक व विद्यार्थीमुलांचे कित्येक सामाजिक, सांस्कृतिक , मनोरंजनाचे कार्यक्रम संपन्न करतात... तसेच समाजातील विशेष व्यक्तींचा सन्मान सुद्धा केला जातोय...असे कित्येक सामाजिक उपक्रम या मंडळाद्वारे केले जातात..
विशेष म्हणजे मुंबईतील कांदिवली येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री अनिल बाईंग  यांच्या कलाकृतीने बनलेली १० फुटापर्यंत उंचीची भव्य दिव्य स्वरूपाची मूर्ती इतक्या दूरवर आणायचे अवघड काम फक्त आणि फक्त नवीन शेव्याचे ग्रामस्थ  उत्कर्ष मंडळच करते म्हणूनच या गणपतीला नवीन शेव्याचा राजा असे संबोधले जाते...आणि म्हणूनच या राजाच्या आगमनाला आणि विसर्जनाला सर्वोत्कृष्ट बँड बाजा पथक ठरलेले असतात... मंडळाचे सर्व सभासद हा कार्यक्रम उत्कृष्ट व शिस्तबद्ध नियोजन पद्धतीने होण्यासाठी प्रयत्नशील असतात...

Post a Comment

Previous Post Next Post