महाराष्ट्र वेदभुमी

मालसई ग्रामपंचायतीत विकास कामांचे भूमी पूजन,खा.सुनील तटकरेंचे ग्रामस्थांना आश्वासन.


कोलाड (श्याम लोखंडे):रायगड रत्नागिरी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष कार्यसम्राट खासदार तथा कोकण विकासाचे शिलेदार सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते रोहा तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत मालसई हद्दीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण सोहळा मोठया उत्साही वातावरणात पार पडला...

तालुक्यातील मालसई ग्राम पंचायत हद्दीतील उडदवने, मुठवली खुर्द येथे विविध कामांचे भूमिपूजन तसेच केलेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा खासदार सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न करण्यात आले.ग्राम पंचायत हद्दीतील उडदवणे, सांगडे ,मुठवली या गावातील जल जीवन नलपानी योजना व सामजिक सभागृह यांचे शुभारंभ खासदार सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले तर गावातील अंतर्गत विकास कामांचे भूमपूजन यावेली करण्यात आले तसेच येथील गावच्या सार्वांगिक विकासासाठी कटिबध्द असल्याचे सांगत मुठवली खुर्द ते डम्पिंग ग्राउंड रस्ता ,तसेच गावातील अंतर्गत रस्ते येत्या कालावधीत पूर्ण करुन देण्याचे आश्वासन यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी ग्रामस्थ नागरीकांना दिले...

गेली अनेक वर्षे विकासापासून वंचित राहिलेल्या या गावांना मंत्री अदिती ताई तटकरे,मा.आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विकासाचे शिलेदार खासदार सुनील तटकरे यांच्या कृपाशीर्वादाने रखडलेल्या विकासाला धामणसई पंचक्रोशीत गती मिळाली असल्याने परिसरातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. खऱ्या अर्थाने विभागाला विकासाची गंगा वाहत असल्याने केलेल्या विकास कामांचे लोकार्पण तसेच अधिकच्या विकास कामांचे भूमिपूजन लोकनेते खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सुरेश मगर,विनोदभाऊ पशिलकर,अनंत देशमुख, अनंत  थिटे, नवनीत डोलकर, तंटामुक्ती अध्यक्ष घनश्याम कराळे,महेश बामुगडे,सरपंच सौ.मयुरी तुपकर तसेच सर्व सदस्य गाव कमिटी अध्यक्ष व पंच कमिटी आदी ग्रामस्थ महीला युवक बहुसंख्येने उपस्थित होते...

प्रसंगी यावेळी उडदवने येथे डोंगरी विकास अंतर्गत श्री स्वामी समर्थ मठ सामाजिक सभागृह,सांगडे येथे जलजीवन मिशन नळ पाणी पुरवठा,सांगडे येथील अंगणवाडी इमारत भूमिपूजन,मुठवली खुर्द येथे जलजीवन मिशन नळ पाणी पुरवठा,मुठवली खुर्द येथे डोंगरी विकास अंतर्गत महिला सामाजिक सभागृह,मुठवली खुर्द येथे जनसुविधा अंतर्गत श्री भैरवीनाथ मंदिरासमोरील जोड इत्यादी विकास कामांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले...

सदरच्या कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांचे वारकरी संप्रदाय ज्येष्ठ नागरिक ह.भ. प. परिवार तर्फे धोतर, टोपी, उपरणे अशी वारकरी संप्रदायाची आठवण म्हणून भेट देऊन त्यांचे सत्कार केला तसेच ग्राम पंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने देखील खासदार तसेच उपस्थितीत मान्यवरांचे स्वागत करण्यात आले...

Post a Comment

Previous Post Next Post