महाराष्ट्र वेदभुमी

तिसे गावच्या सौ.मालती बिरगावले यांचे दुःखद निधन

 


कोलाड (श्याम लोखंडे ) : रोहा तालुक्यातील तिसे गावचे माजी पोलीस पाटील बाळकृष्ण बिरगावले यांच्या पत्नी तसेच कोलाड रोहा लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष तथा कोलाड विभागीय कुणबी समाजाचे पदाधिकारी नरेश बिरगावले यांच्या मातोश्री सौ मालती बिरगावले यांचे शनिवारी २१ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून मृत्यू समयी त्या ७६ वर्षाच्या होत्या.मालती बिरगावले हया अत्यंत प्रेमळ आणि शांत स्वभावाच्या सर्वांच्यात मिळून मिसळून राहणाऱ्या तसेच सर्वाच्या परोपकारी पडणाऱ्या म्हणून सुपरिचित होत्या.त्या गावच्या सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय होत्या तसेच त्यांना शेतीची त्याचबरोबर धार्मिक आणि आध्यत्मिक कार्याची आणि महिलांच्या विविध उपक्रमात सहभागी होण्याची मोठी आवड होती.अशा माय माऊलीचे निधन झाल्याने बिरगावले कुटुंबावर दुःखाचे डोंगर तर तीसे गावासह परीसरात शोककळा पसरली आहे...

मालती बिरगावले यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी तसेच त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांचे नातेवाईक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक,तसेच विविध क्षेत्रातील असंख्य नागरिक दुःखी समाज बांधव, कोलाड रोहा लायन्स क्लबचे पदाधिकारी, कुणबी समाजाचे पदाधिकारी, विविध समाजाचे पदाधिकारी व सदस्य,तसेच समस्त  तिसे ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्चात त्यांचे पती माजी पोलीस पाटील बाळकृष्ण बिरगावले,दोन मुले नरेश आणि महेश बिरगावले, सुना,नातवंडे व मोठा बिरगावले परिवार आहे.त्यांचे दशक्रिया विधी सोमवारी ३० सप्टेंबर २०२४ तर उत्तरकार्य विधी बुधवारी २ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांच्या राहत्या घरी मौजे तिसे त्यांच्या निवास्थानी होणार आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post