महाराष्ट्र वेदभुमी

कोलाडमध्ये आज्ञात चोरट्याने दुकान फोडले १लाख ७५ते २लाख रू किं सिगारेटचा माल रोख १६००/- रू.केले लपांस

कोलाड आंबेवाडी नाका बाजार पेठेतील बनारस जनरल स्टोअर्स मध्ये चोरीची घटना..

कोलाड (श्याम लोखंडे )

मुंबई-गोवा हायवेवरील कोलाड आंबेवाडी नाका बाजारपेठेतील तटकरे पार्क येथील बनारस जनरल स्टोअर्सचे मालक फुलंचद जैस्वाल यांचे आज्ञात चोरट्याने दुकान फोडून अंदाजे १ लाख ७५ हजार रुपये ते २ लाख रुपयांपर्यंत रुपये किमतीचा सिगारेटचा माल तसेच १५००ते १६०० रुपयाची रोकड चिल्लर दुकानाचा लॉक व स्वेटर तोडून  मुद्देमासाहित लंपास केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडल्याने परीसरात एकच खळबळ उडाली...

कोलाड आंबेवाडी नाक्यावर चोरट्यांचा धुमाकूळ सुरू मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री आंबेवाडी नाक्यावरील बाजारपेठेतील बनारस जनरल स्टोअर्सचे मालक फुलचंद जैस्वाल यांच्या दुकान गाला शेटरचे लॉक तोडून दुकानातुन फोर्सकर, क्रश, गोल्डफ्लॅक, इंडिमेंट, ऍडव्हान्स, क्लोमिक्स, लाईट, डबल बटण, गोल्डफ्लॅक किंग, लाईट, क्लासिक आईसबर्ड, माईल्ड, अशा विविध प्रकारच्या सिगारेटचा अंदाजे एक लाख ७५ हजार ते २  लाखा पर्यंतचा माल तसेच १५०० ते १६०० रुपयांची चिल्लर चोरट्यांनी लंपास केली असल्याचे समजते...

तर सदरच्या कोलाड आंबेवाडी नाक्यावरील घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून विशेष म्हणजेच गेली दोन महिन्यांत कोलाड ते वाकण दरम्यान ७ ते ८ दुकाने फोडून आज्ञात चोरट्यांकडून मुद्देमाल लंपास केले असल्याच्या घटना घडल्या असुन या सर्वच दुकानातुन फक्त सिगारेटचा माल व रोख रक्कम चोरीला जात असल्याने विक्रेते दुकान मालक चिंताग्रस्त झाला असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे...

तर कोलाड आंबेवाडी येथील बनारस जनरल स्टोअरचे मालक फुलचंद जैस्वाल यांच्या लक्षात येताच त्यांनी सदरच्या घटनेची माहिती कोलाड पोलिसांना दिली असुन याची माहिती मिळताच कोलाड पोलिस निरिक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी यांनी हा घटनेची पाहणी करून सदरच्या घटनेचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले...

Post a Comment

Previous Post Next Post