महाराष्ट्र वेदभुमी

चाकूचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार कासार सिरसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


कासार सिरसी/४ सप्टेंबर प्रतिनिधी/लातूर : जिल्ह्यातील तालुका निलंगा येथील कासार सिरसी पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेवर चाकूचा धाक व दाखवत अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली असून आरोपी फरार आहे.. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .. 


कासार सिरसी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या या संतापजनक घटनेची सविस्तर माहिती अशी की मंगळवार ३ सप्टेंबरच्या  मध्यरात्री २  ते ४ च्या सुमारास रामलिंग मुदगड येथील रहिवाशी शिकलोधन बाबुराव कांबळे यांनी मौजे मुदगडवाडी येथे जाऊन पीडित महिलेस चाकूचा धाक दाखवत बळजबरीने तिला मोटरसायकलीवर आणून रामलिंग मुदगड येथील स्वतःच्या घरी बलात्कार केला...

 वरील घटनेची फिर्याद पीडित महिलेने स्वतः कासार शिरशी पोलीस ठाण्यात दिली असून आरोपी शिकलोधन बाबुराव कांबळे हा फरार असल्याचे सांगण्यात आले आहे...

  या घटनेच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना झाले असून या घटनेचा सर्वत्र तीव्र निषेध करण्यात येत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post