माणगाव :- (नरेश पाटील) गणेश उत्सव सणाचा पार्श्वूमीवर सणाचे उत्साह वाढविण्यासाठी पोलीस बांधव यांना मोदक प्रसाद वाटप गणेश उत्सव दिवस शनिवारी दि.०७ सप्टेंबर रोजी सकाली करण्यात आले.. उपविभागीय पोलीस अधिकारी, पीआय, ट्रॅफिक पोलिस कर्मचारी सह पोलीस शिपाई, होम गार्ड तसेच ट्रॅफिक ड्युटीवर आसलेले स्वयंसेवक, माणगाव व्यापार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्षमण बाळा दळवी, पदाधिकारी, सदस्य, व्यापारी बांधव उपस्थित होते...
गणेश उत्सव सणाचा काळात मोठया प्रमाणात गणेश भक्त मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे येतून हजारो संख्येने चाकरमानी आप आपला वाहन, एस्टी, खासगी गाडीने कोकणात दाखल होत असतात... ही सर्व वाहने व गणेश भक्तांना व्यवस्थित आपल्या गावी जाण्यासाठी सणाच्या पाच दिवस अधीपासुन तसेच उत्सवाच्य दिवसात अहोरात्र पोलीस ऑन ड्युटीवर काम करीत असतात...मात्र स्वतःच्या घरी सणाच्या दिवसात अनुपस्थित असतात.. त्यांना सणाचे उत्सवचे वातावरण व आनंदी ठेवण्यासाठी व आरोग्य सुदृढ राहावी म्हणून मोदक प्रसाद बरोबर पौष्टीक आहार जसे चिकी, समोसा, शेंगदाणे आणी बिसलेरी पान्याचे क वाटप करण्यात आले...
या नामांकित संघटनेकडून सातव्या वर्षातही प्रसाद वाटप उपक्रम हाती घेण्यात आला असून संघटनेचे पदाधिकारी यांनी एकूण दहा गट तयार करून इतर व्यापार बांधव यांचा सोबत वाहतूक पोलीस चौकी, निजामपूर रोड कॉर्नर, रेल्वे स्टेशन रोड, निजामपूर रोड, कचेरी रोड कॉर्नर, मोर्बा रोड कॉर्नर, दालघर फाटा, अश्या विविध नाका त्याचबरोबर स्वयं सेवक तरूण वर्ग तसेच पोलीस ठाणा, तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, पंचायत समिती, माणगाव नगर पंचायत या ही ठिकाणी ऑन ड्युटी वर आसलेल्या अधिकारी,कर्मचारी, शिपाई यांना मोदक प्रसाद देण्यात आला....
