सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक: वीर हनुमान मंदिर आनंद नगर रामटेक येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुक्यास्तरीय सभेचे आयोजन करण्यात आले होते... तातुक्यातुन बहुसंख्येने शिक्षक उपस्थित होते... जिल्हाध्यक्ष श्री राजकुमारजी वैद्य यांचे अध्यक्षतेखाली सभेचे सुरवात करण्यात आले... या सभेत रामटेक तालुका कार्यकारिणीचे पुनर्गठन करण्यात आले... यात सर्वानुमते हरहुन्नरी व्यक्तीमत्व श्री नामदेव राठोड सर यांची तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तर सरचिटणीस पदी संदीप वाढीवे यांची नियुक्ती करण्यात आली...
अजय चव्हाण (कार्याध्यक्ष), परसगाये (सहसचिव) श्री शंकर कनाके (कोषाध्यक्ष), गोदावरे, जाम्भूळे, धम्मानद बागडे, योगेश वरठी (उपाध्यक्ष), निलेश नन्नावरे (प्रसिद्धी प्रमुख) चारुलता टेकाडे (महिला प्रमुख) याप्रमाणे नियुक्त्या देण्यात आल्या...सभेचे प्रास्ताविक शिक्षक नेते श्री नरेंद्र डबीर यांनी केले तर आभार श्री मनोहर वांढरे यांनी मानले, सभेला बालचंद जी नाटकर, अशोक झगडमवार, भास्कर चव्हाण, मनोहर सोनटक्के, संतोष राठोड, पुरुषोत्तम हटवार, दिलीप ढोमने, भोपे आदी उपस्थित होते...
