महेश कला केंद्रात नागावकर कुटुंबातील तिसरी पिढी जपतेय सुबक मूर्तीची कला
मूनवली येथील नागावकर कुटुंबाने आपली तिसरी पिढी गणपतींची व देवींची मूर्ती तसेच मुखवटे यांची सुबक मूर्तीकला बनवण्याची परंपरा जपत आहेत. कै. मधुकर नागावकर यांच्या वडिलांनी काही दशकांपूर्वी सुरू केलेले हे कलाकेंद्र मधुकर नागावकर यांच्या नंतर महेश नागावकर यांची हि तिसरी पिढी आपली कलेची परंपरा जोमाने पुढे घेऊन जात आहेत. ह्या कलाकेंद्रात गणपतींच्या व देवींच्या मुखवट्यासह आकर्षक मूर्ती बनवण्यात येतात. पंचक्रोशीतील गणेशभक्तांच्या मागणी प्रमाणे कलाकेंद्रात आकर्षक व सुबक तसेच सुंदर मूर्ती घडविण्यात येतात, या आकर्षक मुर्त्या आता प्रसिद्ध मूर्तिकार महेश नागावकर हे घडवत आहेत...
यासोबतच या महेश कलाकेंद्रात गणेश मूर्ती, देवीच्या मूर्ती, तसेच हुबेहूब कॅनव्हास पोर्टेट पेंटिंग, लेटर पेंटिंग, थर्माकोल वरील नक्षीकाम पेंटिंग व त्यावरील नावांची कोरीव कामे, सर्व प्रकारच्या वाहनांची पेंटिंग, साइन बोर्ड पेंटिंग आदी कलेची कामे केली जात आहेत...
फोटो लाईन :
पहिल्या चित्रात - मूनवली येथील महेश कलाकेंद्रात गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवताना कलाकार महेश नागावकर,
दुसऱ्या चित्रात -मूनवली येथील महेश कलाकेंद्रात गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवताना सौ. नागावकर,
