माणगाव प्रतिनिधी नरेश पाटील :- १९३ श्रीवर्धन विधान सभा मतदार संघाकरीता प्रदेश काँग्रेस पक्ष सर्वतोपरी ताकद देणार असल्याचे भारदस्त तसेच उर्जा देणारे वक्तव्य सभा दरम्यान राज्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचे आयोजित केलेल्या सभा दरम्यान महत्त्व पूर्ण विधान केले आहे...
सदर सभा माणगाव पक्ष कार्यालयात रविवारी दि. ०१ सप्टेंबर रोजी दुपारी १२:३० च्या वेळेत पार पडले... सदर सभा तब्बळ तीन तासाहून अधिक काळ चालले होते...महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस पक्षाचे कार्यकाऱ्रणीची सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले... यावेळी त्यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा काँग्रेस चिटणीस डॉ.नरेंद्र सिंह, माणगाव तालुका काँग्रेस पक्ष अध्यक्ष विलास सुर्वे, श्रीवर्धन ता. अध्यक्ष सादिक भाई राऊत, तळा ता.अध्यक्ष शरद भोसले सह पक्षाचे विविध पदावर आसलेल्या पदाधिकारी उपस्थित होते... सभेची सुरूवात विजय तोडणकर यानी प्रस्तावना करून श्रीवर्धन येतील जुने जाणते काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत तथा नामांकित कार्यकर्ता वाडकर यांचे निधन पर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली... चंद्रकांत पाटील यांचे स्वागत सादिक भाई राऊत यांनी पुष्पगुच्छ देवून सन्मानित केले...मान्यवरांच्या तसेच उपस्थित व्यक्ती यांना गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आली...दरम्यान उपस्थित पदाधिकारी, सदस्य तसेच कार्यकर्ता यानी काँग्रेस पक्ष बळकठी, अडचण, सूचना, निर्णय, मत प्रकट करुन पक्ष वादी साठी संवाद साधून अभिप्राय नोंदवले... या नंतर विलास सुर्वे यांनी ही भाषण केले...
दरम्यानचा काळात कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविलेले राज्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी प्रथम उपस्थित सर्वांचे स्वागत केले.. ते म्हणाले की मला काही गोष्ठी सांगायच्या होत्या परंतु बरच्या मुद्दे तुमचा मनोगत मधुन व्यक्त केले आहे... पक्षाचे स्वाभिमान व अभिमान आपण सर्वांनी जागरुक ठेवले पाहिजे, होणाऱ्या अडी अडचणीतून आपण मार्ग काढले पाहिजे...एकिकाळ असा होता की श्रीवर्धन मतदार संघ हे राज्य काँग्रेस पक्षाचे वैभव व महत्व होता... काही महिन्यानंतर विधान सभा निवडणूक होणार आहे... तर आपला विधानसभा मतदार संघाकरीता तुम्हाला उमेदवार मागणी करण्याचा अधिकार जरी नाही मात्र ठरवण्याची अधिकार मात्र नक्कीच तुम्हाला आहे असे सांगताच जोरदार सर्वांनी थाळ्या वाजवून दाद दिले...तर कदाचित तुमचा मधुन एकाद्याला उमेदवारीची लॉटरी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही... आणि भविष्यात पेण मतदार संघाचे तुमच्याकडून मोठी मदत होवू शकते असे ही पुष्टी पाटिल यांनी जोडले व येणारा १९३ श्रीवर्धन विधान सभा मतदार संघा करीता प्रदेश काँग्रेस पक्ष सर्व तोपरी ताकद देणार असल्याचे भाष्य केल्याने श्रीवर्धन विधान सभा मतदार संघाला एक नविन ऊर्जा प्राप्त झाल्याचे संकेत मिळाले आहे व इतर अनेक मुद्दे मांडून चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषण आटोपता घेतले...
दरम्यानचा काळात पक्षाचे महत्व पदाधिकारी जसे इम्तियाज कोकाटे,गणपत गमरे, विजय तोडणकर, सज्जाद सरखोत, वेटू पवार, खेळू गांबिर, महादेव आडीत, प्रकाश पालव, समिर बोरकर, तस्लिम बुरुड, राजा, अबरार काळोखे, शब्बीर इब्राहिम सौ. अनिता महाडिक सह आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते...
