महाराष्ट्र वेदभुमी

तळागाळातील सर्व सामान्य घटक एकत्र येण्यासाठी टिळकांनी गणेश उत्सव सुरु केला :- सपोनि नितीन मोहिते

 पुगाव रोहा ( नंदकुमार कळमकर ) : गावातील सर्व समाजातील घटक एकत्र येऊन गावात काय चाललंय? काय नाही? तुमचे आचार विचार, कोणत्या घटना घडल्या आहेत... यातून काय मार्ग काढला पाहिजे यासाठी वर्षातून एकदा एकत्र येण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सुरु केला...तो साजरा करतांना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेतली पाहिजे असे मत पुई येथील गणेश उत्सव निमित्त आयोजित शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याच्या कार्यक्रमात कोलाड सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मोहिते यांनी व्यक्त केले...


  पुई येथील मुलांनी मुलींवर होणारे अत्याचार व व्यसन मुक्ती यांचे पोस्टर लावून एक अनोखा संदेश कोलाड परिसरातील जनतेला दिला आहे...परंतु पोलिसांना कोणतेही गोष्ट सांगितल्या शिवाय कळत नाही यामुळे मुलींनी शांत राहून जमणार नाही कोणतेही गोष्टीचा प्रतिकार करा कोणतीही गोष्ट लपवून न ठेवता आई वडील बहीण शिक्षक यांना सांगितली पाहिजे अन्यायाला वाचा फोडा तेव्हाच त्याला आळा बसेल असे मत नितीन मोहिते यांनी व्यक्त केले..

              येथील मुलांनी मुलींनवर होणारे अत्याचार व व्यसनमुक्ती यावर २२ पोस्टर तयार केले याची स्पर्धा घेण्यात आले याचे परीक्षण सपोनि नितीन मोहिते यांनी करून एक ते तीन नंबर जाहीर केले व स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले याशिवाय सर्व सहभागी स्पर्धेकांना प्रमाणपत्र देण्यात आले.तसेच अंगणवाडी ते १५ वी पर्यंत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले...

            यावेळी कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते,अंमलदार नरेश पाटील, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनंत सानप,अध्यक्ष विठ्ठल पवार,उपाध्यक्ष सचिन लहाने,

सचिव हरिचंद्र कदम, खजिनदार मंगेश सानप,सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य अजित लहाने सुजाता कदम, विठोबा सानप, ज्ञानेश्वर खामकर,समीर पडवळ,डॉ.सागर सानप, दिनकर सानप,सचिन दिसले, विश्वास लहाने,अनिकेत शिर्के,अलोक दिवेकर, नरेश लहाने, लक्ष्मण पवार, मंगेश सानप, संदीप शिर्के, असंख्य ग्रामस्थ, महिला, तरुण वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते...

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतांना डॉ. सागर सानप यांनी सांगितले कि आमच्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाला १७ वर्षे पूर्ण झाली असुन दरवर्षी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवित असतो. कोणताही वाद नाही कोणताही तंटा नाही.महिलांचे ही विविध उपक्रम सुरु असतात. कार्यक्रमात शेवटी उपस्थित्यांचे अभार ही डॉ सागर सानप यांनी मानले...

Post a Comment

Previous Post Next Post