सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक : भारतीय संस्कृतीमध्ये सण समारंभाना विशेष महत्व आह... महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गणपती उत्सव साजरा केला जातो... घरोघरी बाप्पाचे आगमन झाल्यानंतर सगळीकडे एक वेगळाच उत्साह निर्माण होतो...
गणपती उत्सवात सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते...गणपतीच्या आगमनाची चाहूल लागल्यानंतर सगळीकडे आनंदाचे वातावरण असते... गणपती आल्यानंतर बाप्पाची मनोभावे पूजा करून गोडाचा मोदक पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवला जातो...
७ सप्टेंबरला गणराया घराघरात झाले विराजमान.
आगमन मोठ्या उत्साहात झाले... भक्तानि मोटरसायकल, चारचाकी किंवा ऑटोमध्ये गणपती घरी आणून त्याची स्थापना केली... रामटेकमध्ये कुंभार समाजातील २० कुटुंबे गणपतीच्या मातीच्या मूर्ती तयार करतात... मूर्तिकार भगवान पाठक यांनी सांगितले की रामटेक शहरासह ग्रामीण भागात सुमारे पाच हजार मूर्तींची विक्री झाल्याची माहिती दिली... गणेशमूर्ती २०० ते ३००० रुपयांना विकली गेली... काही मूर्तिकारांकडे गणेश प्रतिमा शिल्लक राहिल्या...
रामटेक पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रशांत काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेक पोलीस ठाण्यांतर्गत ४२ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशजींची स्थापना केली आहे... यामध्ये ७ ठिकाणी शहरात तर ३५ ठिकाणी ग्रामीण भागात आहेत...
