महाराष्ट्र वेदभुमी

प्रत्येक शाळेत कौशल्य प्रशिक्षण आवश्यक - माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई

माणगांवात प्रबोधनने सुरू केले रोजगाराचे नवे पर्व


माणगांव :- (नरेश पाटील)

   भारत देशात भरपूर मनुष्यबळ आहे... सुशिक्षित युवक देखील मोठ्या प्रमाणात आहेत... मात्र त्यांना रोजगार आणि नोकऱ्या उपलब्ध नाहीत... त्यासाठी प्रत्येक शाळेत किमान कौशल्य आधारित प्रशिक्षण देणे आवश्यक आहे... भारतात नोकऱ्यांची कमी नाही... परंतु, कुशल कामगार नसल्याने नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत... यासाठी प्रबोधन कौशल्य निकेतन मार्फत तळागाळातील गोरगरीब विध्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहोत...या रोजगार संधीमुळे त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहे, असे प्रतिपादन माणगांव येथील प्रबोधन कौशल्य निकेतन मार्फत आयोजित करण्यात आलेल्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले... 

   माणगांव येथील महानगर गॅस लिमिटेड आणि  पहल नर्चरिंग लाईव्हस यांच्या सहकार्याने प्रबोधन कौशल्य निकेतनचे संस्थापक आणि माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले...

 यावेळी प्रबोधन संस्थापक सुभाष देसाई म्हणाले की, प्रबोधनने तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी विविध छोटे मोठे प्रशिक्षण सुरू करून रोजगाराचे नवे पर्व सुरू केले आहे... या प्रशिक्षित कौशल्यावर आधारित उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रायगड जिल्ह्यातील कंपन्यांनी मोलाची साथ देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे... या प्रबोधन कौशल्य निकेतनच्या इमारतीसाठी महानगर गॅस लि. यांनी सामाजिक दायित्व निधीतून सुमारे ३ कोटी ५० लक्ष इतका निधी दिला...तर पहल या संस्थे मार्फत  प्रशिक्षण दिले जाते...  माणगांव तालुक्यात ३०% आदिवासी विद्यार्थी असून एकूण ७५% सुशिक्षित बेकार तरुण आहेत... दहावी, बारावी पास, नापास नंतर यातील बरेचसे विध्यार्थी अर्धवट शिक्षण सोडून देत असल्याचे दिसून आले आहे... हे प्रशिक्षण घेण्यासाठी ६००० जणांशी प्रत्यक्ष संपर्क साधला... त्यातील निवडक विध्यार्थी प्रशिक्षणास तयार झाले... आजपर्यंत १६० प्रशिक्षणार्थी कौशल्य प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत... त्यातील ८५% प्रशिक्षिताना कंपनीमध्ये रोजगार उपलब्ध झाला आहे... तर उर्वरितांनी आपला स्वतः व्यवसाय सुरू केला आहे... इतर शैक्षणिक संस्थेत पदवी आणि पदविका  उपलब्ध आहेत... परंतु, या संस्थेत प्रशिक्षणाबरोबरच रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे...या संस्थेमध्ये संगणक, परिचारिका, सौंदर्य प्रशिक्षण, विजतंत्री, मोबाईल दुरुस्ती, ए. सी., फ्रिज रिपेरिंग, शिवणकाम, गॅस दुरुस्ती, इंग्रजी संवाद कौशल्य, प्लबिंग इ. चे प्रशिक्षण दिले जाते...मागासवर्गीय आणि आदिवासी विध्यार्थ्यांना प्राधान्याने प्रशिक्षण दिले जात आहे...

      या कार्यक्रमाला महाराष्ट्र सिमलेस लि. अधिकारी शिवकुमार जिंदाल, मानव संसाधन उपप्रमुख आत्मकुमार चक्रपाणी, रोहा औद्योगिक क्षेत्र चेअरमन भारदेस्कर, प्रबोधन गोरेगाव अध्यक्ष नितीन शिंदे, प्रबोधन संचालक डॉ. संतोष कामेरकर, पहल अंकुश भारद्वाज, नगरसेवक अजित तार्लेकर, डॉ. परेश उभारे, ग्रामीण प्रगती फाऊंडेशन मंगेश डफळे, विध्यार्थी, पालक, ई. उपस्थित होते... यावेळी विध्यार्थी व पालक यांनी आपले मनोगत व्यक्त केले...

Post a Comment

Previous Post Next Post