महाराष्ट्र वेदभुमी

बँक ऑफ इंडिया रायगड विभागातर्फे सतर्कता जागृत अभियानांतर्गत ग्रामसभेला उस्पूर्त प्रतिसाद

 


कोलाड (श्याम लोखंडे): देशपातळीवर बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असून राज्यात तसेच जिल्हा स्तरावरील रायगड  जिल्ह्याची अग्रणी असलेल्या बँक शाखेमार्फत “एकात्मतेच्या संस्कृतीद्वारे राष्ट्राची समृद्धी” या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरात  16 ऑगस्ट ते 15 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जागरूकता सप्ताह पाळत आहेत...

या अंतर्गत  रायगड विभागातील येणाऱ्या  सर्व शाखांनी जिल्ह्यात विविध वेगवेगळ्या ठिकाणी 20 सप्टेंबर 2024 रोजी स्तरावर ग्रामसभा आयोजित केली होती.याला संबधीत ग्राहकांकडून उत्स्पुर्त प्रतिसाद मिळाला...यावेळी झोनल मॅनेजर मुकेश कुमार व डेप्युटी झोनल मॅनेजर बिरेन चॅटर्जी यांच्या मार्गदर्शनानुसार बँक ऑफ इंडिया रायगड झोनतर्फे विविध ग्रामीण व निमशहरी शाखांमध्ये विविध शाखांच्या शाखा व्यवस्थापकांनी ग्रामसभा आयोजित केल्या होत्या...

तर सदरच्या सभेत ज्यामध्ये ग्राहकांना फसवणुकीशी संबंधित माहिती देत त्यांना शाखेतील खातेसंबधी तसेच विविध प्रकारचे मौलिक मार्गदर्शन करत जागरूक करण्यात आले...तसेच उत्सपूर्त प्रतिसाद लाभलेल्या या बैठकीत ग्राहकांना खात्यासंबधी काळजी घेण्यासाठी मोबाईलवर आलेले ओटीपी शेअर करू नका, एटीएम पिन आणि सायबरलिंक शेअर करू नका, त्याच बरोबर जास्त  व्याज असणारे कर्ज घेऊन कर्जच्या विळख्यात अडकू नका,असे समजावून सांगण्यात आले...त्याच बरोबर ग्राहकांना अधिक कसे कसे फसवले जाते याबाबत संबंधित सखोल माहिती उपस्थितांकडून देण्यात आली...

Post a Comment

Previous Post Next Post