व्यक्तीची माहिती असल्यास 8888915939 / 76660 87375 या मो. क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन-मुरुड पोलीस निरीक्षक
शहानवाज मुकादम/रोहा
दि:०८/०९/२०२४
रोहा : मुरुड शहरातील गावदेवी पाखाडी मधील कमलाकर नागु सुभेदार ही व्यक्ती दुकानावरून सामान आणण्याकरिता गेले असता ते घरी परत न आल्याने त्यांची पत्नी कविता कमलाकार सुभेदार यांनी मुरुड पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार १३/२०१३ नुसार दाखल आहे...
सविस्तर, तक्रारदार कविता सुभेदार यांनी सांगितले की माझे पती कमलाकर सुभेदार वय ४८ वर्षे शिक्षण ७ वी,चेहरा उभट,अंगाने सडपातळ,रंगाने गोरे , उंची ५ फुट ६ इंच ,अंगात फुलं हाताचा शर्ट व काळ्या रंगाची फुलं पॅन्ट घालून ४ सष्टेंबर २०१३ रोजी सकाळी ०९.३० वाजता आपल्या राहत्या घरातुन किरणा सामान आणण्याकरिता जातो असे सांगून गेले परंतु अजुन पर्यंत घरी न आल्याने मुरुड पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे...
सदर ची तक्रार मुरुड पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार के.टी.पाटील यांनी नोंद केली असुन पुढील तपास मुरुड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार -खेळु शिद हे करित आहेत...
सदरच्या छायाचित्रातील हरवलेल्या व्यक्ती बाबत कोणतीही माहिती मिळाल्यास व दिसुन आल्यास वरील दूरध्वनीवर किवा मुरुड पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक उदय झावरे करीत आहेत...
