महाराष्ट्र वेदभुमी

धोंडखार-खोपे ग्रामस्थ मुंबई मंडळ व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची खा. सुनील तटकरेंकडे धाव!

नळ पाणीपुरवठा योजनेचे सुधारित अंदाजपत्रक व प्रशासकीय मान्यता मिळण्याची केली मांगणी...

शहानवाज मुकादम/रोहा

 रोहा: तालुक्यातील धोंडखार-खोपे येथील ग्रामस्थ मुंबई मंडळ व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांकडून खासदार सुनीलजी तटकरे यांच्याकडे धाव घेत नळ पाणीपुरवठा योजनेचे सुधारित अंदाजपत्रक व प्रशासकीय मान्यता मिळण्याची मांगणी केली..

 दि:११/०९/२०२४, रोजी  रायगडचे कर्तव्यदक्ष  खासदार सुनीलजी तटकरे यांची धोंडखार खोपे येथील नळ पाणीपुरवठा योजना (जल जीवन मिशन) चे सुधारित अंदाजपत्रक व प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून सदर योजनेस मंजुरी आदेश मिळावे,..याविषयी रायगडचे खा. सुनील तटकरे यांना लेखी निवेदन देण्यात आले...

  वेळात वेळ काढून गावाला हक्काचे पिण्याचे पाणी मिळावे या एका तळमळीने पंचायत समिती रोहाचे उपसभापती रामचंद्र सकपाळ यांच्या माध्यमातून धोंडखार  धोंडखार-खोपे येथील मुंबई व वाशी मंडळाच अध्यक्ष यशवंत तानपाटील  वाशी कोपरीगावचे अध्यक्ष महेंद्र मांडलेकर, मुंबई कमेटीचे सदस्य रमेश निरकर, रमेश मांडलेकर, छगन म्हात्रे, तसेच शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते शंकर दिवकर, तसेच धोंडखार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रशांत मांडलेकर, गणेश गावडे, नारायण निरकर, जगदीश मांडलेकर, जयेश घोसाळकर आणि धोंडखार गावातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post