सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमीं तसेच ओबीसी महासंघात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे...
४ डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त नौदल विभागाच्या वतीने राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला होता... या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते... हा पुतळा शिवप्रेमींसाठी आकर्षक ठरला होता. यावर आता राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावरील स्मारका वरील शिवाजी महाराजच्या पुतळा कोसळल्याच्या घडलेल्या दुर्घटनेच्या निषेधार्त राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे ३१ ऑगस्ट ला रामटेकचे नायब तहसीलदार भोजराज बड़वाईक यांना निवेदन देण्यात आले... ततपुर्वी छत्रपती शिवाजी महाराजच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून बस स्टॉप येथून तहसील कार्यालया ला जावून निवेदन दिले...
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष कांचनमाला माकडे, ओबीसी महासंघ विधानसभा प्रमुख नानाभाऊ उराडे, रमाकांत कुंभलकर, गणपत भूरे, बालचंद खोड़े, मोरेश्वर माकड़े, सुरेखा उराडे, कामिनी हटवार सहित आदि उपस्थीत होते...
