आदिवासी दिनानिमित्त आमदार जयस्वाल यांचे आदिवासी बांधावासोबत नृत्य
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आमदार अँड. आशिष जयस्वाल यांनी आदिवासी दिनानिमित रामटेक शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. जागतिक आदिवासी गौरव दिन सोहळ्याच्या निमित्ताने काल दि. ९ ऑगस्ट रोजी शहराच्या विविध भागातून आलेल्या आदिवासी समाज बांधवांनी महारॅली काढून सादर केलेल्या वैविध्यपूर्ण कलाप्रकारांना पाहून रामटेकवासी भारावून गेले. रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांना देखील मोह अनावर झाला आणि त्यांनी देखील नृत्यात सहभाग घेतला...
९ ऑगस्ट हा दिवस 'जागतिक आदिवासी दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. जगभरातील आदिवासी समुहांचे हक्क अबाधित राखून त्यांचे रक्षण व्हावे, आदिवासींना सन्मानाने जगता यावे यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघात अंतर्गत येणारे बहुतांश गावे हे आदिवासी बहुल आहेत. या आदिवासी बांधवांचा गौरव आणि आदिवासी दिना प्रती त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी काल आदिवासी समाजाच्या वतीने शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांनी सहभागी होत समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या. तर पारंपरिक आदिवासी नृत्यात सहभागी होत नृत्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सर्व महारॅलीचा शांती सभागृहात विविध कार्यक्रमाने सांगता करण्यात आली. या कार्यक्रमा दरम्यान समाजातील गुणवंत विद्यार्थी , प्रशासकीय अधिकारी व विविध समाजसेवक व्यक्तिमत्त्वांचा उपस्थित मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार ॲड. आशिष जयस्वाल तर प्रमुख उपस्थिती म्हणून संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विवेक तुरक, संदीप मडावी, धुर्वे, जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे, कन्हैया पंधराम, चंद्रकांत कोडवते ( पंचायत समिती सभापती), रामा अडामे, आकाश पंधरे,दिलीप वरखडे, दीपचंद्र शेंडे, संजय मडावी, मंगला सरोदे, राम येडके, प्रभु परतेती, सुरेन वरकडे, , नितीन दराडे, अनिल रौतेले, भारत मोहबीया, शरद सोनवणे, सुदाम गाते, प्रदीप कोडवते, यश वानखडे, उत्तम वाढवे, रमेश मारस्कोल्हे, जगदीश वरकडे यांच्या सह समाजातील असंख्य महिला व बांधव उपस्थित होते.
आदिवासी समाजासाठी कटिबध्द - आमदार जयस्वाल
मागील २५ ते ३० वर्षांच्या राजकारणातील प्रत्येक यशात आदिवासी समाजाचा मोलाचा वाटा आहे.
. त्यामुळे आदिवासी समाजासाठी मी कटिबध्द राहणार असुन आजवर शबरी घरकुल योजनेतून सर्वात जास्त घरकुल देण्याचे काम आपल्या मतदारसंघांत झाले आहे...तर प्रसिद्ध पर्यटक स्थळाच्या धर्तीवर कुवारा भिवसेन या तीर्थक्षेत्राचा विकास चालु असून लवकर या तीर्थक्षेत्राचे कामे पूर्ण होणारं आहे. याच बरोबर लाडकी बहीण योजनेचे सर्वात जास्त अर्ज मतदारसंघात भरले जात असून याचा फायदा आदिवासी माता - भगिनींना होणारं असल्याची माहिती आमदार आशिष जयस्वाल यांनी दिली..
