बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडी तर्फे महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती, परंतु न्यायालयाच्या निर्णयाचा व संविधानाचा आदर करून महाविकास आघाडीने २४ तारखेचा बंद रद्द केला असला तरी महाराष्ट्रातील लेकींच्या संरक्षणासाठी लढा सुरूच राहणार हा निर्धार व्यक्त करण्यासाठी शनिवार दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ११.०० ते १२.०० वाजेपर्यंत एक तास महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली उरण शहरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ काळी फीत तोंडाला बांधून शांततेत निषेध करण्यात आले...
महाविकास आघाडीचे माजी आमदार, महाविकास आघाडीचे नेते यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या काळी फीत बांधून निषेध कार्यक्रम प्रसंगी उरण मधील गांधी पुतळा येथे शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते काका पाटील,जेष्ठ नेते महादेव बंडा,जेष्ठ नेते सीताराम नाखवा,उरण शहराध्यक्ष नयना पाटील, माजी पंचायत समिती सदस्य माया पाटील,उरण तालुकाध्यक्ष सीमा घरत,शहर उपाध्यक्ष रंजना पाटील, रमाकांत म्हात्रे, माजी नगराध्यक्ष नाहिदा ठाकूर, जेष्ठ साहित्यिक एल. बी. पाटील, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट )रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, उपजिल्हा संघटिका ममता पाटील,माजी नगरसेविका सुजाता गायकवाड, दिपक भोईर, शहर संघटक महेश वर्तक, गणेश घरत, रंजना तांडेल,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर,कामगार नेते संतोष घरत, गणेश नलावडे, तालुका अध्यक्ष मनोज भगत,तालुकाध्यक्ष हेमांगी पाटील,युवक अध्यक्ष समाधान म्हात्रे, मंगेश कांबळे, आम आदमी पार्टीचे उरण तालुकाध्यक्ष संतोष भगत, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य चिटणीस मिलिंद पाडगावकर, रायगड जिल्हा सरचिटणीस रामनाथ पंडित,कामगार नेते किरीट पाटील, रायगड उपाध्यक्ष दत्तात्रेय म्हात्रे, उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, उरण तालुका अध्यक्ष रेखा घरत, तालुका उपाध्यक्ष निर्मला पाटील,माजी नगरसेवक बबन कांबळे,भेंडखळ ग्रामपंचायत सदस्य दिपक ठाकूर,देविदास थळी, कॉम्रेड भूषण पाटील, कॉम्रेड संजय ठाकूर, जनवादी महिला संघटनेचे हेमलता पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह उरण विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक, शाखा प्रमुख,चिटणीस, सरपंच, सदस्य, युवक संघटना, महिला आघाडी, युवा सेना, विद्यार्थी संघटना, तसेच महाविकास आघाडीच्या अंगीकृत संघटनाचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते...
