महाराष्ट्र वेदभुमी

पुगाव ग्रामपंचायत तंटामुक्त अध्यक्षपदी नारायणराव धनवी.


पुगांव रोहा(नंदकुमार कळमकर):रोहा तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक,  कला, क्रिडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण तसेच राजकीय क्षेत्रात सदैव तत्पर असलेले समाज नेते नारायणराव रघुनाथ धनवी (बाबूजी) यांची पुगाव ग्राम पंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली..

ग्रा.पं. कार्यालयाच्या सभागृहात गुरूवारी २२ ऑगस्ट रोजी प्रशासक रणजित लवटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते सामजिक कार्यकर्ते तसेच रायगडचे खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत भाई तटकरे, यांचे कट्टर समर्थक तसेच रोहा पंचायत समितीचे  समन्वय शिक्षण समितीचे सदस्य नारायणराव धनवी यांची पुगाव ग्राम पंचायत तंटामुक्त अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली...

गावच्या सर्वांगिक विकासासाठी सदैव तत्पर असलेले नारायणराव धनवी यांनी या आधी देखील सदरच्या ग्राम पंचायतीत महात्मा गांधी तंटामुक्त समितीवर दोनवेळा अध्यक्षपद भूषविले होते.. तसेच गावात सदैव शांतता आणि संयमता नांदावी तसेच कायदा सुव्यवस्थेचे उत्तमरीत्या पालन आणि सार्वजनिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आवश्यक ती मदत करणारे नारायणराव धनवी यांची सर्वानुमते पुन्हा तिसऱ्यांदा तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली... त्यांची निवड झाल्याने उपस्थित सभागृहातील ग्राम सरपंच उपसरपंच सर्व सदस्य हद्दीतील ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या...

प्रशासक रणजित लवटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ग्राम सभेत यावेळी माजी सरपंच नेहा म्हसकर, माजी उपसरपंच नीलम कळमकर , गणेश म्हसकर, अदिती झोलगे, राम धूपकर, रचना कळमकर, अनिता खामकर, ग्रामसेविका प्रिया कुंडे, सह ग्राम पंचायत हद्दीतील बहुसंख्येने ग्रामस्थ व आदिवासी बांधव उपस्थितीत होते...

Post a Comment

Previous Post Next Post