महाराष्ट्र वेदभुमी

ताई गोळवलकर महा विद्यालयात करिअर संसदेची स्थापना


सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :- श्रीराम शिक्षण संस्था, ताई गोळवलकर महाविद्यालय, रामटेक येथे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची करियर संसद स्थापन करण्यात आली... यामध्ये विद्यार्थिनी कु. खुशी चावके हिची मुख्यमंत्री तर बाकी विविध मंत्री पदावर इतर विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आली...

  करियर संसद शपथविधी सोहळ्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू, डॉ. विजय राऊत, डॉ. चंद्रमोहन सिंग आणि करिअर कट्टा समन्वयक डॉ. राहुल हंगरगे उपस्थित होते. ..या सोहळ्यामध्ये उपस्थित प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना करिअर संसदेचे नेमणूक पत्र व बॅचेस सन्मानचिन्ह म्हणून दिले... महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या आणि बी.एससी. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना करिअर कट्टा या उपक्रमामध्ये नोंदणी करण्यास उत्स्फूर्त केले... करियर कट्टा समन्वयक डॉ. राहुल हंगरगे यांनी कार्यक्रमाचे संचलन केले तसेच विद्यार्थ्यांकडून शपथविधीची प्रक्रिया पूर्ण केली, यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या... कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. विजय राऊत यांनी केले...

Post a Comment

Previous Post Next Post