महाराष्ट्र वेदभुमी

उरणमधील माजी आ.मनोहर भोईर आणि ठाकरे गटाला मोठा धक्का..!



ठाकरे गटाच्या जसखार गावच्या सरपंच काशीबाई ठाकूर यांचा आफिल अर्ज मा. कोकण आयुक्त यांनी फेटाळला...

जसखार उरण ग्रामपंचायत सरपंचपदी प्रणाली किशोर म्हात्रे (शिवसेना शिंदे गट )यांची निवड.

उरण दि २८(विठ्ठल ममताबादे ): रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील सर्वात श्रीमंत  समजली जाणारी जसखार ग्रामपंचायत ही शिवसेना ठाकरे गटा कडे होती परंतु ठाकरे गटाच्या सरपंच काशिबाई ठाकूर यांचे पद हे शासकीय जागेत केलेल्या अतिक्रमणामुळे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिनांक १९.०७.२०२४ अपात्र केले होते... परंतु काशीबाई ठाकूर यांनी मा. कोकण आयुक्त यांच्या कडे आफिल अर्ज केला होता...
 अर्जाच्या पहिल्या सुनावणीच्या वेळी मा.अतिरिक्त विभागीय आयुक्त विकास पानसरे यांनी ०२.०८.२०२४ रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशावर स्थगिती देण्यात आली होती... परंतु पुढील सुनावणीस दरम्यान सामनेवाला यांचे वकील ऍड.परेश देशमुख यांनी आपली बाजू मांडल्या नंतर मा.अतिरिक्त विभागीय आयुक्त विकास पानसरे यांनी २३.०८.२०२४ रोजी काशीबाई ठाकूर यांचे आफिल अर्ज फेटाळले आहे...आणि जिल्हाधिकारी रायगड यांचेकडील आदेश क्र ग्रामपंचायत विवाद अर्ज क्र. ०१/२०२३ मध्ये दि १७.७.२०२४ रोजी दिलेले आदेश कायम केला आहे...
त्यामुळे सातत्याने लक्ष घालून असलेल्या उरणमधील माजी आमदार मनोहर भोईर आणि ठाकरे गटाला ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.. आणि आता पुन्हा एकदा सरपंच म्हणून  प्रणाली किशोर म्हात्रे (शिवसेना शिंदे गट )ह्यांनी पदभार स्वीकारला आहे...तिचे सर्व गटातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post