महाराष्ट्र वेदभुमी

माणगाव नगर पं. मुख्यधिकारी संतोष माळी यांच्या हस्ते झेंडा वंदन संपन्न.

 


माणगाव :- (नरेश पाटील) : ७८ वा  स्वातंत्र्य दिनाचे आयोजित ध्वजा वंदन कार्यक्रम मुख्यधिकरी संतोष माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत व अमूल्य हस्तेनी झेंडा वंदन कार्यक्रम हर्ष उल्लासाचा वातावरणात संपन्न झाला... या वेळी दुसऱ्या टर्म करीता नव्याने नगराध्यक्ष पदावर विराजमान झालेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, सर्व नगरसेवक, नगरसेविका ,कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार सह परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ,शालेय शिक्षक तसेच विद्यार्थि मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते... नगर पंचायतच्या जागेत नविन ईमारत बांधकाम होत असल्याचा पार्श्वभूमीवर सदर कार्यक्रम पहिल्यांदाच  उतेखोल येथील जलशुध्दीकरण केंद्र या ठिकाणी सकाळी ०८.१० वाजता ध्वजा रोहणाचा कार्यक्रम मा. संतोष माळी,मुख्याधिकारी , माणगाव नगरपंचायत , माणगाव यांचे शुभहस्ते आयोजित करण्यात आला.. उपस्थित यानी झेंडेला सलामी देवून राष्ट्र गीत गायन केले... 

 देश भक्ती पर सामूहिक शपथ वाचन घेण्यात आली... या नंतर संतोष माळी, ज्ञानदेव पोवार सह उपस्थित अनेक नगरसेवक, नगरसेविका व नगर पंचायत येथील अधिकारी यानी आग विजवण्याची एक मिनी टू व्हीलर वाहन, एक कचरा उचल करणारी नवीन टिपर त्याचारोबर एक नवीन ट्रॅक्टर वाहनाचे तत्पूर्वी उपस्थित मान्यवर यानी श्रीफळ वाढवून त्याच बरोबरीने फीत कापून लोकार्पण केले... यानंतर न. पंचायत येथील महीला कार्यालयीन कर्मचारी यानी देशभक्तीपर मधूर वाणीत गाणी सादर केली...


 दरम्यानचा काळात उपस्थित सर्व विद्यार्थि यांना चॉकलेट वाटप करण्यात आले... या दरम्यान झेंडा वंदन ठिकाणी अतीशय सुंदर सजावट केल्याने परीसर तिरांगमय झालेल्याचे पाहायला मिळाले आणि झेंडा वंदन कार्यक्रम संपन्न होताच अनेकांनी मुख्यधीकरी मा.संतोष माळी, नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांना भेटून अनेकांनी स्वातंत्र्य दिनाच्या खास अभिनंदन व शुभेच्छा उपस्थित सर्वांना ही हस्तांदोलन करून दिल्या...

Post a Comment

Previous Post Next Post