महाराष्ट्र वेदभुमी

एस् टी थांब निदर्शनास आणून दिले... एकता मंडळ कौतुकास पात्र.-सौ. छाया कोळी



माणगाव :- (नरेश पाटील): शहरातील एका महत्त्वाचे ठिकाणी एस् टी थांब ची सुविधा आमचा विभागा मार्फत करून देण्याचे जे लक्षात आले नाही, मात्र येथील एकता मित्र मंडळ यानी ती बाब आमच्याकडे एस टी थांब मिळावे म्हणून मागणी केली...व निदर्शनास आणून दिल्याबद्दल एकता नगर मित्र मंडळ कौतुकास पात्र असल्याचे महत्त्वाचे प्रतिपादन एस टी थांब च्या नामफलक उद्घाटन प्रसंगी विचारमंथ व्यासपीठावरून आयोजित कार्यक्रमा प्रसंगी बोलताना माणगाव अगार एस टी डेपो प्रमुख सौ. छाया अनिल कोळी यानी केली...

 दरम्यान ही कार्यक्रम नुकताच संपन्न झालेल्या ७८ वा. स्वातंत्र्याचा पुर्व संध्येला अर्थातच मंगळवार दी. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी मोर्बा रोड येथील नामांकीत हॉटेल पवार वाडा च्या हाकेच्या अंतरावर उभे केलेल्या एसटी थांब नामफलक उद्घाटना ठिकाणी मान्यवर नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, सभापती प्रशांत साबळे, अगार प्रमुख सौ.छाया कोळी,खांदाड गावचे अध्यक्ष काशिराम पोवार, एकता मंडळचे अध्यक्ष निरने सर यांच्या उपस्थितीत पार पडले...

  या नंतर एक छोटा खानी कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकप्रीय नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, माणगाव एस टी अगार प्रमुख सौ. छाया कोळी, सभापती प्रशांत साबळे, खांदाड गावचे अध्यक्ष काशिराम पोवार, एकता नगर मित्र मंडळ चे अध्यक्ष निरने सर, ज्येष्ठ पत्रकार अरुण पोवार सह एस्टी डेपो चे इतर अधिकारी उपस्थित होते...

    दरम्यानचा काळात स्वागत कार्यक्रम , प्रस्तावना व मान्यवर यांचे भाषण पार पडले... कार्यक्रमांचे सुत्र संचालन तत्कालीन ग्रामपंचायतचे सरपंच सौ. धुमाळ यांनी केले.. तर आभार प्रदर्शन देगाव गावचे सरपंच तथा एकता मित्र मंडळचे रहिवासी सदस्या सौ. वाघमारे यांनी केले... कार्यक्रमास खांदाड गावातील पदाधिकारी सह, सदस्य, प्रतिष्ठित ग्रामस्थ, परिसरातील नागरीक आणि एकता नागर येथील एकता मित्र मंडळाचे अनेक पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते... दरम्यानचा काळात माणगाव एस टी डेपोमार्फत एकता नगर मित्र मंडळ एस टी थांब करीता स्व: खर्चाने दोन एस टी थांब चे नामफलक सुपूर्त केले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post