वारंवार विजेच्या लपंडावामुळे त्रस्त नागरिक
महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत, शाळांच्या सुट्ट्या संपल्या आहेत त्यामुळे आता शाळा सुरू झाली आहे घरात लाईट नसल्यामुळे मुलांचा अभ्यास राहून जातो...
प्रधिकरणातील नागरिक आता वेळेवर विज बिल भरतात तरीसुद्धा नागरिकांना वीज समस्यांना सामोरे जावे लागत आहे, वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे खराब होतात, ऑनलाईन काम करणाऱ्या नागरिकांना या समस्येच्या त्रास होतो वीज गेल्यानंतर महावितरणाच्या कार्यालयात फोन केला असता कर्मचारी वेळेवर फोन उचलत नाहीत....
तसेच महिला ,जेष्ठ नागरिक यांना सुद्धा दैनंदिन कामे करताना अडचणी येत आहेत त्यामुळे विजेची सोय कायमस्वरूपी व्हाव...
गेल्या आठ दिवसापासून वशेणी पुनाडे सारडे, पिरकोन, आवरे, पाले, गोवठणे आदि गावातील वीज १०/१२ तास गायब होते...आतातर पाऊस देखील पडत नाही...तरीही वीज गायब होते, विजेच्या अशा लपंडावामुळे त्रस्त नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे... या संतापाचे रूपांतर हल्लाबोल मोर्चात होण्यापूर्वी उरण वीज मंडळाकडून सुधारणा अपेक्षित आहेत...
मध्यंतरी शेकापच्या माध्यमातून उरण वीज मंडळाला धडक देण्यात आली होती...पण धडकेचा कोणताच परिणाम वीज मंडळावर झालेला दिसून येत नाही...
महावितरणाच्या कार्यकारी अभियंतांनी नागरिकांच्या या समस्यांचा विचार करून लवकरात लवकर विजेची सोय कायमस्वरूपी करावी अशी नागरिकांकडून कळकळीची मागणी होत आहे...
