अलिबाग (ओमकार नागावकर) : श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज दक्षिण पीठ नाणिजधाम यांच्या अंतर्गत दि.१७ ऑगस्ट रोजी श्री संप्रदाय चौल सेवा केंद्राच्या वतीने श्री लीलामृत ग्रंथ एक दिवसीय पारायण सोहळा उत्साहात पार पडला...अलिबाग तालुक्यातील चौल गावातील रामेश्वर मंदिरात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते....
या कार्यक्रमासाठी चौल परिसरातील अनेक भक्तगण उपस्थित होते...जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात उदाहरणार्थ रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण तसेच महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी मोफत ॲम्बुलन्स सेवा इत्यादी कार्यक्रम घेण्यात येतात...
नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले...नरेंद्राचार्य महाराजलिखित २१ अध्याय असलेल्या लीलामृत ग्रंथाचा एक दिवसाचा पारायण आयोजित करण्यात आला होता...या सोहळ्यात चौल विभागातील महिला व पुरुष भाविकांनी सहभाग घेतला होता... या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते...सेवा समितीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले... आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली...
