महाराष्ट्र वेदभुमी

रंगतदार गीतांनी रोहेकर मंत्रमुग्ध,भाटे वाचनालयात, सूनहरी यादेच्या कलाकारांनी जिंकली मने.

कोलाड (श्याम लोखंडे) : देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचीत्यसाधून रोहा येथील सार्वजनिक भाटे वाचनालय तर्फे स्वातंत्र्य गीतांचा सूनहरी यादे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याला रोहेकरांनी भरभरुन प्रतिसाद देत या गाण्यांचा आनंद लुटला तर सूनहरी यादे च्या कलाकारांनी सुमधुर संगीत गाण्याच्या तालावर रोहेकर रसिक प्रेक्षक यांना मंत्रमुग्ध करत त्यांची मने जिंकली...

रोहे शस्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रोहा येथील सुप्रसिध्द भाटे वाचनालय सभागृहात 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता रोहा मधील स्थानीक पाकलाकारांचा समावेश असलेला सुनहरी यादे या संगीत ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रफिक नाटूस्कर, राजन टोपरे, दर्पणा दिवेकर,  रेश्मा पाटणकर,  वैभव पोटले, या कलाकारांसोबत मराठी सुपर स्टार मध्ये गाजलेली गायिका विशाखा मोहिते,  तसेच सारेगमप मध्ये गाजलेला गायक रामदास साजेकर, सह एकुण 75 कलाकारांचा समूह तसेच प्रसिद्ध व्यक्तींचा आवाज काढणारा मिमिक्री आर्टिस्ट समीर पाटील यांनी सुद्धा विशेष निमंत्रित म्हणून विशेष सहभाग घेतला...

तसेच कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून रोहा नगर पालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र शेठ गुजर ,अप्पासाहेब देशमुख,राजेश काफरे, वत्सराज सर, मोकल सर, रोहा उर्दू शाळेचे मुख्याध्यापक कलाब सर,रियाझ मोमीन,इकबाल अनावरे,इनायत कोंडविलकर तसेच इतर अनेक मान्यवर तसेच आदी रसिकप्रेशक बहुसंख्येने उपस्थित होते तर रोहेकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वी करण्या साठी सार्वजनिक भाटे वाचनालयचे अध्यक्ष किशोर तावडे,उपाध्यक्ष वसंत भट, महेश कुलकर्णी,राजेश देशमुख,सायली कुलकर्णी,महेंद्र मोरे,हेमंत तलवार,नितीन प्रधान या संचालक मंडळाने अथक परिश्रम घेतले...

तर सदरच्या कार्यक्रमात सूनहरी यादे चे सर्व गायक कलाकारांनी कलामंचावर विविध कलेचे सादरीकरण तसेच स्वातंत्र्य गीते सादर करून सर्वांना मंत्र मुग्ध करत मने जिंकली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूनहरी यादे चे कलाकार आणि पत्रकार शैलेश गावंड यांनी केले...कार्यक्रमात रसिक श्रोत्यांनी भरघोस पारितोषिकांचा वर्षाव करून उत्तम प्रतिसाद दिला...

Post a Comment

Previous Post Next Post