सिकंदर आंबोणकर (गोरेगाव प्रतिनिधी) दि.२०/०८/२०२४. मुंबई गोवा महामार्ग पूर्णत्वासाठी मुंबई -गोवा जन आक्रोश समिती चे पदाधिकारी,कार्यकर्ते आमरण उपोषणाला मु. माणगाव येथे बसले आहेत,त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा,यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे द.रायगड जिल्हा संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड व द.रायगड जिल्हा प्रमुख श्री अनिल नवगणे यांनी दि.१८/०८/२०२४ रोजी तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पाठिंबा जाहीर पाठिंबा केला...
त्यांच्या समवेत पक्षाचे पदाधिकारी जिल्हा संघटक सुधीर सोनवणे, माणगाव तालुका संघटक सिताराम मेस्त्री, मागणाव तालुका प्रमुख गजानन अधिकारी, डॉ.परेश उभारे जिल्हा सचिव युवासेना,उप तालुका प्रमुख मधुकर नाडकर मानगाव, माणगाव शहर प्रमुख अजित तार्लेकर, विभाग प्रमुख प्रभाकर ढेपे, अजिंक्य जाधव युवासेना शहर प्रमुख, अनिल मोरे ज्येष्ठ शिवसैनिक, सागर गांधी उपशहर प्रमुख, अनिल सोनार उपशहर प्रमुख, इब्राहिम कारेशर शहर संघटक, गंगाराम काते माजी शाखाप्रमुख, प्रवीण पाटोले, शहर समन्वयक अथर्व हाटे युवा शिवसैनिक, किसन घोले शाखाप्रमुख,आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते...
