द्रोणागिरी-उरण ३० ऑगस्ट अजय शिवकर: शासनाच्या महावाचन उत्सव उपक्रमांतर्गत उरण तालुका शिक्षण विभागाने मा.प्रियंका म्हात्रे मॅडम गटशिक्षणाधिकारी पं.स.उरण यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते...काल दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था भागुबाई चांगु ठाकूर विद्यालय द्रोणागिरी या विद्यालयात ग्रंथ दिंडी व ग्रंथ प्रदर्शन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते... या कार्यक्रमासाठी मा.सौ.प्रियंका म्हात्रे मॅडम गटशिक्षणाधिकारी पं.स.उरण प्रमुख मान्यवर शाळेचे चेअरमन मान. श्री.चंद्रकांत घरत सर या शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा काटे मॅडम उरण तालुक्यातील सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख, सर्व विषय साधन व्यक्ती, सर्व माध्य.व प्राथ. शिक्षक वृंद, विद्यार्थी वर्ग उपस्थित होते...
सुरुवातीला ज्ञानेश्वर माऊलींच्या ग्रंथाचे पूजन करून ग्रंथदिंडी ढोल लेझीमच्या तालावर ग्रंथ दिंडी काढण्यात आली...तदनंतर तालुक्यातील विविध शाळांनी शाळांतर्गत असणाऱ्या विविध पुस्तकांचे प्रदर्शन मांडले होते... त्याचप्रमाणे शिक्षक वर्ग देखील आपल्या पुस्तकांची प्रदर्शन मांडून विक्रीसाठी पुस्तके ठेवली होती...त्यामध्ये श्री.मच्छिंद्र म्हात्रे सर यांनी स्वलिखित पुस्तके विक्रीसाठी ठेवली होती...त्याचे देखील उद्घाटन करून या ग्रंथोत्सवाला मान्यवरांनी भेट दिली...सौ.प्रियंका म्हात्रे मॅडम यांनी नियोजनबद्ध अशा कार्यक्रमाचे कौतुक केले...
या कार्यक्रमात चंद्रकांत घरत यांनी अध्यक्ष भाषण करताना ग्रंथ हेच गुरु असून विद्यार्थ्यांना वाचन समृद्धी वाढवण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन केले हा स्तुत्य उपक्रम असून त्यांनी अधिकाधिक सर्व शाळांमध्ये असे उपक्रम ग्रंथोत्सव राबवावेत... असे मत व्यक्त केले... श्री.नरेश मोकाशी सर केंद्रप्रमुख यांनी हा श्रावण हा ग्रंथाचा पवित्र महिना असून कोकणात प्रत्येक गावातील मंदिरात पूर्ण महिनाभर विविध ग्रंथ वाचन केले जाते.हा वारसा जपला पाहिजे... असे मत व्यक्त केले... सौ.काटे मॅडम यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे भरभरून कौतुक केले... या उपक्रमाच्या समन्वयक सौ.निलम गावंड यांनी उत्तम नियोजन केले होते...या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मुकेश महाजन सर पं.स.उरण यांनी तर आभार श्री.संजय होळकर सर मुळेखंड यांनी मांडले...