मुख्यमंत्री साहेब...! लाडकी बहीण म्हणता पण बहीणीचे संरक्षण का नाही करू शकत...?
कायद्याने संरक्षण होत नसेल तर आम्हाला स्वतःचे रक्षण करण्यासाठी शस्त्र ठेवण्याची परवानगी द्यावी..
माननिय. एकनाथराव शिंदे साहेब..
लोकप्रिय मुख्यमंत्री
विषय :- मुलींच्या संरक्षणासाठी शस्त्र ठेवण्याची परवानगी देण्यात यावी
मा.
महोदय
माझे नाव :- अंजली रंजित अहिरे आहे साहेब
श्री स्वामी समर्थ रुग्णसेवा संस्था यामध्ये अध्यक्ष आहे मी.. वय वषे:-२३ आहे... मी ऐका सामान्य घरातील मुलगी आहे... तुम्ही जवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्जव जिल्ह्यामध्ये // तालुका / शहर / ह्या ठीकाणी लाडकी बहीण योजना पसरवली आहे... प्रत्येक बहीणीच्या खात्यावर ३००० रुपये पाठवले देखील... आम्हाला तुम्ही तुमची बहीण होण्याची संधी दिलीत... त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो आम्हीं...
पण साहेब आमच्या संरक्षणबाबत आपण निर्णय केव्हा घेणार?...ऐका आठवड्यात चार नाबालिक- बालिक मुलींचा जीव घेण्यात आला... तोही निर्घृणपणे यावर आपण काय केले साहेब ? बालिक मुलीवर जीवघेणा हल्ला होतो... रस्ता / पेट्रोल पंप /अश्या खुल्या जागी तिच्यावर अटॅक केला जातो...कोणीही मदतीला येत नाहीं... आणि असे पुन्हा घडू नये... हे कसे. थांबवावे..हा विचार करण्याच्या सोडून समाज विचार करतो मुलींचीच चुकी असेल... तिन्ही लहान कपडे परीधान केलें असतील , म्हणुन असे झाले असेल तिच्यासोबत..असा विचार केला जातो.. असे का साहेब?..माणसाच्या रुपात राक्षस जन्माला आलेला असेल ते आम्हा मुलींना थोडी ठाऊक असते..? त्याला आम्हीं मुलींनी काय करावे... ४ वर्षाच्या मुलींवर लैंगिक अत्याचार होतो... हया चिमुकलीला काय कळत होते... ? तुम्ही गरोदरपणामध्ये गर्भलिंग चाचणी होऊ नये...म्हणुन कायदा केला आहे... साहेब ह्याचं कारण भृणहत्या होऊ नये...काय उपयोग या कायद्याचा साहेब ? ऐक मुलीला नऊ महिने पोटात ठेऊन वाढवणे, २० वर्ष तिचा सांभाळ करणे, आणि नंतर? तिच्यावर लैंगीक अत्त्याचार होतो... तीची हत्या होते... तिच्या शरीराचे तुकडे करून जीव घेतला जातो...त्या आई- वडीलांचे काळीज कुठे असेल...ह्याची कल्पना तरी आपण करुन बघा... काय अर्थ आहे भ्रूणहत्या रोखण्याचा कधी काही पाल्यांना मुली नको असतात... म्हणून ते भ्रूण हत्या करण्याबाबत विचार करतात, तर जन्मानंतर असे नराधम आमचा जीव घेतात असे का ? अश्याने असा एक दिवस येईल की हया जगात स्त्री नावाचं अस्तित्व संपुन जाईल... आज आमच्यासोबत असे घडत आहे.. उद्या तुमच्याही मुलीसोबत घडू शकते... कारण हत्या करणाऱ्या नराधमाला भान नसते ,की ती सामान्य मुलगी आहे....की एका मुख्यमंत्र्याची कारण त्याला भान असते तर त्याने कोणत्या मुलीचा जीव नसता घेतला साहेब...!
आपण यावर निर्णय केव्हा घेणार...? रोज एका घरातील मुलीचा जीव जात आहे..? तुम्ही कठोर असा निर्णय का नाहीं घेत आहात साहेब...? एक आमच्या संरक्षण बाबत निर्णय घ्या किंवा आम्हाला स्वतःचे संरक्षण करू शकतो ह्याची परवानगी दया...३००० रुपये अकाऊंटला देण्यापेक्षा आम्हाला स्व.तःचे संरक्षणसाठी शस्त्र जवळ ठेवण्याची परवानगी देण्यात यावी... एवढ्या घरातील मुलिंचा जीव जात आहे...एका मुलीला निर्घृणपणे मारण्यात येते...तेव्हा कायद्याचा विचार केला जात नाहीं... मग एका नराधमाला भर चौकात जाळण्यात का येत नाहीं..? तेव्हा कायद्याचा विचार का केला जात आहे...? काय माहित उद्या मी असेल हया जागेवर ? माझी आज समाजात समाजसेविका म्हणुन ओळख आहे.. मला रुग्णांसाठी रात्र बेरात्र बाहेर राहावे लागते... एकतर तुम्ही कठोर निर्णय घ्या किंवा आम्हाला शस्त्र ठेवण्याची परवानगी देण्यात यावी... तुम्ही आमचा जीव नाहीं वाचवु शकत आहात तर आम्ही आमचे संरक्षण करू शकतो साहेब...! जन्म देऊन २० वर्ष तिला मोठं करणं,तिचं पालनपोषण करणे, आणि तिला गमावणे एका आई-बापासाठी किती धक्कादायक गोष्ट आहे... ते तुम्हाला नाही कळणार साहेब...?रोज एका घरातील मुलीचा बळी जात आहे.... कधी २० वर्ष तर कधी ३१ वर्ष असणारी तर कधी ४ वर्षाची असणारी... नाहीं तर भ्रूणहत्याच्या कायदा मध्ये बदल करा... मुलींना जन्म देऊ नका..असा नियम बनवा... किंवा कायदा बनवा...यासाठी मापी साहेब... 🙏🙏 कारण जन्मानंतर परत आमचा वयात आलो की जीव जाणारच आहे... आम्हाला मोठं करण्यासाठी आमचे आई- वडील रक्ताचं पाणी करतात... त्यांच्या जीवाचे तरी का हाल व्हावे...?आपणास विंनती आहे...
आमच्या संरक्षणबाबत निर्णय घ्यावा... नाहीतर आम्हाला शस्त्र ठेवण्याची परवानगी देण्यात यावी...साहेब आम्हाला काहीं होताना जग तमाशा पाहतो... कोणीही मदत करण्यासाठी पुढे येत नाहीं... मात्र Instagram वर reel send केली जाते..
"आता तुमच्या लाडक्या बहीणीचे पाय लांडग्याच्या जबड्यात आहे...!"
बोला दादा, मी तुमची कुणीच नाही का..?
मी कुणाची मुलगी,
मी कुणाची बहीण,
मी कुणाची बायको,
मी कुणाची आई...
कुणाची कुणी तरी आहे,
म्हणून तुमची कुणीच नाही का?
सांगा ना हो दादा...!
आपल्यात माणुसकीचे नाते आहे ना..
बोला ना हो दादा...!
मी कुणाची छोटी परी आहे,
मी कुणाची छोटी छकुली आहे,
मी कुणाची मोठी दीदी आहे,
मी कुणाची लाडकी लेक आहे...
कुणाची कुणी तरी आहे,
म्हणून तुमची कुणीच नाही का?
बोला ना हो दादा...!
अत्याचार करून, मला ठार मारून,
तुम्हाला मिळते क्षणिक सुख..
या सुखाच्या मोबदल्यात आयुष्य माझं उध्वस्त..!
स्वप्नांची राखरांगोळी, चेहऱ्या वरचं हसू कायमच मरतं,
माझं म्हणावं असं काहीच उरलेलं नसतं..!
दया-याचना करते मी... पण, वासनेत हापापसलेली तुम्ही माझे लचके तोडता,
विरोध करतेय तर मला बेदम मारता, जीव घेता..!
कुणाची कुणीतरी आहे,
म्हणून तुमची कुणीच नाही का?
बोला ना हो दादा...!
मी तुमची कुणीच नाही का...?
-स्त्री मन
तुमची लाडकी बहीण
अंजली रंजित अहिरे
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित,
समाजसेविका महाराष्ट्र शासन...
अंजली...




.jpg)