महाराष्ट्र वेदभुमी

शेतकरी कामगार पक्ष्याचा निष्ठावंत कार्यकर्ता हरपला.

मयूर पालवणकर (मुरुड): मुरुड तालुक्यातील मीठेखार गावचे रहिवासी आणि शेकापक्ष्याचे निष्ठावंत कार्यकर्ते शरद बाळकृष्ण चवरकर यांचं अल्पश्या आजाराने सोमवार दी. (१२/८/२०२४) रोजी वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले...त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे...

शरद चवरकर यांनी शेतकरी कामगार पक्षाचे मुरुड तालुका पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष , मुरुड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक,को ए सो नारायण कमल्या गायकर माध्यमिक शाळा वळकेचे चेअरमन होते...मनमिळाऊ आणि गोरगरिबांच्या अडीअडचणीच्या वेळी त्यांचे कायमचे सहकार्य असायचे...

 शरद चवरकर यांच्या निधनाची वार्ता समजताच तलेखार ते सालाव विभागात सर्वत्र शोक व्यक्त होत आहे... निधनाची वार्ता समजताच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, आप्तेष्ट, आणि मित्रपरिवाराने त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले... त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे... कै शरद चवरकर यांच्या पार्थिवावर मिटेखार येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले...या वेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता..

Post a Comment

Previous Post Next Post