रोहा प्रतिनिधी नंदेश गायकर...
भारतीय स्वातंत्र्य दिवस १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केला जातो... याच दिवशी आपल्या देशाला इंग्रज राजवटीतून सुटका मिळाली...याचाच आनंद म्हणून सर्वत्र देशाच्या या जल्लोषात सामील होऊन प्रत्येक शासकीय इमारतीवर देशाचा राष्ट्रध्वज फडकवला जातो... रोहा तालुक्यातील भागिरथीखार शाळेत देशाचा ७८ वा १५ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला...
सकाळी शाळेय मुला मुलींची प्रभात फेरी घोषणा देत काढण्यात आली...देशाचा राष्ट्रगीत व ध्वजगीत शाळेय विद्यार्थी विद्यार्थीनींनी गायला...सदर शाळेत झेंडावंदन शेडसई ग्रामपंचायत सदस्य तानाजी म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले... सदर कार्यक्रमासाठी मान्यवर श्री.ज्ञानेश्वर कोळी,माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. दामोदर म्हात्रे, नंदू बाळाराम म्हात्रे, श्री.सिताराम म्हात्रे, श्री वामन पारंगे श्री.संजय म्हात्रे, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. विलास म्हात्रे, श्री.देवचंद्र म्हात्रे, श्री.भरत म्हात्रे, श्री.गोवर्धन माळी, श्री.भास्कर मोरे, श्री.मंगेश कोळी, श्री.मारूती म्हात्रे, श्री.संदीप घरत, श्री. गणपत म्हात्रे, पत्रकार नंदेश गायकर शाळेय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी ज्योती माळी, अंगणवाडी सेविका भारती रघुनाथ म्हात्रे , महिला सौ.सुजाता म्हात्रे, माधुरी म्हात्रे, प्रिती घरत, पिंकी पारंगे, आवर्जून उपस्थित होते...
सदर कार्यक्रमाची रूपरेषा व सुत्रसंचालन सौ.गोळे मॅडम, व श्री जाधवर सर यांनी पाहिली...शाळेय विद्यार्थी, शिक्षक गण आणि मान्यवरांची भाषणं झाली...वरील कार्यक्रमातून आपल्या देशाविषयी असलेली आत्मियता आपुलकी प्रेम दिसून आलं, आणि कार्यक्रमाची सांगता झाली...
