महाराष्ट्र वेदभुमी

२४ तासांत ७८ हजार ४५०/-महिलांच्या खात्यात रुपये जमा : आ.जयस्वाल

आमदार ॲड.जयस्वाल यांनी घेतला तहसिल कार्यालयात योजनेचा आढावा


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:- लाडकी बहिण योजने अंतर्गत मतदार संघातील सर्व महिलांना यांचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी आमदार ॲड. आशिष जयस्वाल सातत्याने पाठपुरावा करत आहेत... याच अनुषंगाने आज स्थानिक तहसिल कार्यालयामध्ये या योजेनची आमदार जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित सर्व अधिकारी व समिती सदस्यांची दुसरी बैठक पार पडली... पहिल्या बैठकीत रामटेक, पारशिवणी व मौदा तालुक्यातील  ७९  हजारा पेक्षा महिलांचे अर्ज प्राप्त झाले...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसंदर्भात  रामटेक तहसिल कार्यालयात दुसरी बैठक पार पडली. या योजना समितीचा पदसिद्ध अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिलो. पहिल्या बैठकी मध्ये जरी मोठया प्रमाणा मध्ये प्राप्त अर्ज ऑनलाईन झालेले होतें. त्यातील निम्मे अर्ज हे ऑनलाईन होणे बाकी होतें. त्यामुळे पहिल्या बैठकीत तिन्ही तहसिलदार व संबधित अधिकाऱ्यांना तात्काळ हे अर्ज ऑनलाईन करावे यातील त्रुट्या दूर कराव्या अशा सूचना दिल्या होत्या... त्या सूचनेनुसार सर्व अर्जाची युद्ध पातळीवर ऑनलाईन प्रक्रिया पार पडली... आणि त्यासर्व अर्जाना रामटेक तालुक्यातील ३१ हजार ८८०, पारशिवणी ३१ हजार ७२५ व मौदा तालुक्यातील विधानसभा समाविष्ट गावातील १६ हजार १२३ महिलांच्या अर्जाना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे ७८ हजारापेक्षा जास्त महिलांच्या खात्यात आजवर दोन महिन्यांचे प्रत्येकी ३ हजार रुपये जमा झाले आहे. तर काही शुल्लक कारणामुळे अर्ज नोंदणी केलेल्या १९१३ महिलांचे काही त्रुटी मुळे अर्ज अपात्र ठरले आहे. यासर्व त्रुट्या दूर करून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ देण्यासाठी तात्काळ कारवाई करण्यात यावी अशा सूचना दिल्या...

यावेळी या बैठकीत रामटेक, पारशिवणी, मौदा येथिल तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, महिला बाल विकास अधिकारी, समितीच्या अशासकीय सदस्य नंदाताई लोहबरे, राहुल मेंघर, जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे, शिवसेना शहरप्रमुख राजेश किंमतकर यांच्यासह संपूर्ण संबंधित अधिकारी उपस्थित होते..

 ३१ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री साधणार संवाद

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी दि. ३१ ऑगस्ट रोजी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः नागपूर येथिल रेशीम बाग येथे येणार आहेत...त्यासंबंधी आयोजित कार्यक्रमाची रूपरेषा आणि आढावा आजच्या बैठकीतून घेण्यात आला... व्यापक आणि विस्तृत असलेली ही योजना गाव खेड्यापर्यंत आणि प्रत्येक माता-भगिनी पर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनातील ज्या घटकांनी अथक परिश्रम घेतले त्या  सर्व अधिकारी आणि कर्मचारी, गावातील अंगणवाडी सेविका, डाटा ऑपरेटर, माझे राजकीय व सामाजिक सहकारी यांचे आभार व्यक्त केले... या योजनेत कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी सर्वांनी घ्यावी असे आव्हान आजच्या बैठकीतून केले...

Post a Comment

Previous Post Next Post