महाराष्ट्र वेदभुमी

मुंबई गोवा महामार्ग खांब येथे नव्याने उभारलेले जोड रस्त्याच्या उड्डाण पुलाचे वाहतूक सुरु होण्याआधी कठडे कोसळले..


कोलाड (श्याम लोखंडे) 

मुंबई गोवा महामार्गावरील खांब येथे नव्याने बांधण्यात आलेले जोड रस्त्याच्या उड्डाणपुलाचे काम निकृष्ट दर्जाचे त्यामुळे वाहतूक सुरु होण्याआधीच त्याचे कठडे ढासळल्याने खांब नाक्यावर सर्वत्र एकच खळबळ उडाली तर प्रवाश्यांच्या जिवाचा खेळ मांडला असल्याचे या केलेल्या कामातून दिसून येत आहे तसेच शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये हे वाया गेले असल्याच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे...    

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील नागोठणे कोलाड दरम्यान खांब नाक्यावरील जोड रस्त्याच्या उड्डाण पुलाचे काम गेली अनेक वर्षांपासून सुरु होते ते पूर्ण झाले असल्याचे संबधीत ठेकेदार यांनी भासवत या मार्गांवरील उड्डाण पुलावरील वाहतूक दोन तीन दिवसांनंतर सुरु होणार अशी जय्यत तयारी दर्शवित होते मात्र ती वाहतूक सुरु होण्याआधी उड्डाण पुलाला साईडणे उभे केलेले मोठ मोठे रेडीमेंट कठडे हे पूर्णतः ढासळले ते झाली सर्व्हिस रोडवर कोसळले माञ सुदैवाने या प्रसंगी कोणतीही जीवित हानी घडली नसल्याचे समजते परंतु या घटनेमुळे प्रवाशी वर्गात मोठी घबराट पसरली असून जणू प्रवाश्यांच्या जीवाचा खेळ मांडला आहे.अशा या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे याकडे संबधीत खात्याच्या अधिकाऱ्यांनी तसेच स्थानीक आमदार खासदार आधी बांधकाम मंत्री तसेच पालक मंत्री मोहदय यांनी पाहणी करून ठोस उपाय योजना याबाबत करण्यात यावी त्याच बरोबर खांब येथील दोन्हीं बाजूचे सर्व्हिस रोड हे पुर्णतः खड्डेमय झाले आहेत अनेकदा त्यावर मलिदा टाकत दुरूस्ती करण्यात आली मात्र ती फोल ठरली आहे त्यामुळे शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये हे वाया जात असल्याने ही सर्व सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावली जाते का असा सवाल करत नागरिकांमधून तसेच प्रवाशी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे ..

बुधवारी सायंकाळच्या सुमारास सदरच्या जोडण्यात आलेल्या मार्गाच्या उड्डाण पुलाचे संवरक्षण कठडे खाली सर्व्हिस रोडवर कोसळले निकृष्ट दर्जाचे काम केले असल्याने धो धो पडणाऱ्या पावसात मार्गावरुन वाहतुक सूरू करण्याआधीच एका पाठोपाठ एक असे कठडे कोसळले मात्र सुदैवानं कोणतीही जीवित हानी घडली नाही मात्र घडलेल्या घटनेमुळे काळ आला होता परंतु वेळ आली न्हवती असे म्हटले जात आहे.तर संबधीत ठेकदर यांनी तत्काळ ते कठडे आणि माती बाजूला करुन मार्ग मोकळा केला.या परिसरातून पांचिविस ते तीस गावांचा खांब बाजारपेठेची समावेश आहे तसेच खांब नाक्यावरून मुंबई कदेम तसेच कोलाड इंदापूर माणगाव महाड कडे प्रवास करणारे असंखे प्रवासी प्रवास करतात तर खांब नाक्यावर मार्ग चौपदरी करणाच्या कामात येथे पादचारी पुल म्हणून जोडरस्ता उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यात आले मात्र ते निकृष्ट दर्जाचे असल्याने या पुलावरून देखील पावसाचे पाणी पाजरत असल्याचं दिसून येते त्यामुळे आता पुलाखालून जा ये करणार्या नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे...

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १७ वर्षांपासून सुरु असुन हे काम केव्हा पूर्ण होईल याची खात्री देता येत नाही.बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कडून दरवर्षी नेहमी रस्ता पूर्ण अशी डेडलाईन दिली जाते परंतु रस्त्याचे काम पूर्ण होत नाही. यामुळे याचा नाहक त्रास प्रवाशी वर्गाला भोगावा लागत आहे. यावरून  रोज मरे त्याला कोण रडे!अशी या महामार्गाची परिस्थिती झाली आहे.खांब नाक्यावरील उड्डाण पुलाचे काम पूर्ण होऊन कोलाड बाजुकडून नागोठणे बाजूकडे जाणारी वाहतूक सुरु करण्यात आली आहे.परंतु नागोठणे बाजुकडून कोलाड बाजूकडील काम ही पूर्ण झाले आहे. ही वाहतूक काही दिवसांनी सुरु केली जाणार होती परंतु वाहतूक सुरु होण्याच्या अगोदरच या उड्डाण पुलाची एक बाजु ढासलली यावरून ठेकेदारानी केलेले काम किती निस्कृष्ठ दर्जाचे आहे हे लक्षात येते याला कारण प्रशासनाचे नसलेले ठेकेदारावर वचक असेच आहे.या संपूर्ण प्रकारामुळे प्रवाशी वर्गात संतापाची लाट उसळली आहे...

प्रतिक्रिया 

मुंबई- गोवा महामार्गवरील खांब बाजारपेठेतील उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले परंतु खांब कडून कोलाड कडे जाणारी वाहतूक या उड्डाण पुलावरून सुरु करण्याच्या अगोदर या पुलाचा भाग ढासळला या ढासळलेल्या भागामुळे बाजूनी जाणाऱ्या वाहनचालकांसहित प्रवाशाला  मोठा अपघात झाला असता तर याला जबाबदार कोण?अशी संतप्त प्रतिक्रिया वैजेनाथ येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश महाबळे यांनी व्यक्त केली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post