शहानवाज मुकादम/रोहा
रोहा: तालुक्यातील नागोठणे येथे मराठी भाषेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड व गोडी निर्माण व्हावी यासाठी एनइएस ऊर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज नागोठणे इयत्ता ९ वी मध्ये दि.३ जुलै २०२४ रोजी मराठी वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते...
सदर कार्यक्रमामध्ये एकूण २६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता... यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकातून अशयाची निवड करून चांगल्या प्रकारे वाचनाचा सरावही केला होता...
या स्पर्धेत कुमार खैरुनिसा कादर सय्यद या विद्यार्थिनीने सर्वात चांगले वाचन करून प्रथम क्रमांक पटकावला आहे...
दुय्यम क्रमांकासाठी यामिन चोगले व अक्सा शेख यांची निवड करण्यात आली असून नाफिया छडिदर व अल्तिषा अन्सारी तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले... त्याच बरोबर फातिमा दफेदार व माविया किरकिरे यांना उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले...
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाफिया छडिदर व अक्सा शेख यांनी वर्ग शिक्षक जव्वाद इस्माईल पेडेकर सर यांच्या मार्गदर्शन खाली केले...
सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण दिनांक ०६/०७/२०२४ रोजी मुख्याध्यापक अतिक अन्सारी यांच्या हस्ते करण्यात आले...या वेळी अन्सरि सरांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व सांगितले तसेच शाळेच्या ग्रंथालयाचा भरपूर फायदा घेऊन वाचनाची आवड निर्माण करण्याचे आवाहन केले...
यावेळी शाळेचे ज्येष्ट शिक्षक बागवान सर,अनिस सर,तस्निम मॅडम,नसीमा मॅडम,शाहीन मॅडम,आशिया मॅडम, नबीला मॅडम उपस्थित होते...
