महाराष्ट्र वेदभुमी

कंत्राटी कामगार संघटनेची स्थापना


सचिन चौरसिया रामटेक 

मा.आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती

रामटेक :- तालुक्यातील नगरधन येथील सुर्यलक्ष्मी कॉटन मिल येथे अनेक कामगार काम करीत असतात, पण बहुतेक कामगार हे कंत्राटी पद्धतीने कामावर आहेत.कंत्राटी कामगारांना कमी वेतन, कामगारांना मिळणाऱ्या सुविधांपासून वंचित ठेवणे असे अनेक कामगारांच्या समस्या आहेत.अश्या अनेक समस्या कंपनी प्रशासन सोबत समनव्य साधून कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता आज सुर्यलक्ष्मी कॉटन मिल, नगरधन येथे "महाराष्ट्र कंत्राटी कामगार संघटनेची" स्थापना करण्यात आली...

या प्रसंगी रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी हे प्रामुख्याने उपस्थित होते. कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक गंगाभोर, उपाध्यक्ष कृष्णा माहुरे, सचिव सुनील रामटेके यांचा सह कार्यकारणी घोषित करण्यात आली...

Post a Comment

Previous Post Next Post