महाराष्ट्र वेदभुमी

आपला दवाखाना मध्ये रक्तदान शिबिर

 


सचिन चौरसिया प्रतिनिधी

 रामटेक :  उपजिल्हा रुग्णालय रामटेक व तालूका आरोग्य कार्यालय रामटेक यांच्या संयुक्त विद्य‌माने स्थानिय गांधी चौक येथील आपला दवाखाना मध्ये सोमवार ८ जुलै रक्तदानाचे शिबिर आयोजन केले... 

  रक्तदानाच्या शिबीरामध्ये १६ रक्तदात्यांनी रक्तदान केले... रक्त संकलनाचे काम डागा स्मृती शासकीय रक्तपेढी नागपुर यानी केले... यावेळी प्रामुख्याने  जिएमसीचे डॉ. संजना टोंगब्राम , डागा हास्पीटलचे  पीआरओ प्रविण बुधकर व डॉ. स्वप्नील चौधरी, तालूका आरोग्य आधिकारी डॉ. स्मीता काकडे, रामटेक उपजिल्हा वैद्यकीय अधिक्षक  डॉ. संजय वाघमारे, करवहीचे वैद्दकिय अधिकारी डॉ. अभिषेक शिलनकर, आपला दवाखाना रामटेकचा वैद्दकिय अधिकारी डॉ.अदिती चव्हान उपस्तित होते... 

  तालुका आरोग्य अधिकारी स्मीता काकडे यांनी मार्गदर्शनावर रक्तदानाचे महत्व सांगताना त्या म्हणाल्या की रक्तदान केल्याने दुसऱ्याना जीवनदान मिळते... सामाजिक बांधीलकि  जपुन स्वच्छेने रक्तदान करा... परिचारिका वंदना झाडे, अधिपरिचारक अभिषेख टांगले,  टेक्नीशियन नागनाथ मोरे, उत्पला धारगावे, विजया तलमले, वासु परिहार, इश्वर बेलखेडे , हॉस्पीटल कर्मचारी हिमांशु, चोपकर, वासु परिहार, सहित आदिने रक्तदान शिबिर यसस्वी ते करीता पर्यत्न केले...

Post a Comment

Previous Post Next Post